Portugal vs Uzbekistan Fifa Football World Cup Marathi News: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे ( Cristiano Ronaldo) चाहते, ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते तो मंगळवारी अनुभवायला मिळाला.. उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या या सुपरस्टारने सहाव्या आणि ३९व्या मिनिटाला गोल करून विश्वविक्रमी कामगिरी केली. सलग सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला, तर पोर्तुगालसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १० गोलचा विक्रमही त्याने आज नावावर केला. याशिवाय त्याने आणखी एक मोठा विक्रम नावावर करताना लिओनेल मेस्सीचा ( Lionel Messi) विक्रमही मोडला.
युसेबियोने १९६६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नऊ गोल केले होते. ते ६० वर्षे पोर्तुगालचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू होते. शिवाय पोर्तुगालसाठी या स्पर्धेत गोल करणारा तो सर्वात तरूण ( २१ वर्ष व १३२ दिवस) व सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने ४१ वर्षे १३८ दिवसांच्या आज गोल केला आणि स्पर्धेत गोल करणारा जगातील दुसरा वयस्कर खेळाडू ठरला.
Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video गोलरक्षकाला चकवा...नूनो मेंडेसने १७व्या मिनिटाला फ्री किकवर केलेला गोलही पाहण्यासारखा होता. सर्वांना वाटलं रोनाल्डो ही फ्री किक घेईल आणि गोलरक्षकाचेही त्याच्यावरच लक्ष होते. पण, रोनाल्डोने चतुराईने मेंडेसला फ्री किक घ्यायला लावली अन् उझबेकिस्तानचे सर्व बचावफळी गांगरली. मेंडेसच्या खात्यात गोल जमा झाला. रोनाल्डोला पहिल्या हाफमध्ये हॅटट्रिक करण्याची संधी होती, परंतु थोडक्यात त्याला अपयश आले.
पोर्तुगालने पहिल्या ४५ मिनिटांत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ३-० अशी आघाडी घेतली. ३० व्या मिनिटाला गानिएव्हने अप्रतिम गोल केला होता. त्याने २० यार्डांवरून उंच उडी मारत चेंडू जाळ्यात टाकला. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे व्हीएआर (VAR) याची तपासणी झाली आणि गोल ग्राह्य धरला गेला नाही. ( "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral)
वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात दोन गोल करणारा तो वयस्कर खेळाडू ठरला. त्याने कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीचा ( ३८ वर्ष व ३६३ दिवस) विक्रमा मोडला. कॅमेरूनचा रॉजर मिला ( ३८ वर्ष व ३४ दिवस), फ्रान्सचा ऑलिव्हियर जिरूड ( ३६ वर्ष व ५३ दिवस) आणि हंगेरीचा फॅजेकास ( ३४ वर्ष व २४३ दिवस) यांचा क्रमांक नंतर येतो.