Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, चेतन चौधरीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, माझा मुलगा त्या वेळी…
Tv9 Marathi June 25, 2026 12:45 PM

Chetan Chaudhary Father Statement : पुण्याजवळील ऐतिहासिर लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. आधी त्याचा पाय घसरून पडल्याने तो गेला असं मानलं जात होतं, मात्र हाँ अपघात नव्हे तर जाणून बुजून केलेला घात आहे, असं काही काळातच उघड झालं. केतनची होणारी बायको सिया आणि तिचा मित्र चेतन यांनीच संगनमताने केतनचा काटा काढल्याचं उघड झालं. पोलिसांनी दोघांना ताब्.ात घेतलं असून न्यायालयासमोर हजर केल्यावर त्यांना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मात्र आता याच केसला आणखी एक नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. अनेक आठवडे कट रचून केलेल्या एका धक्कादायक हत्येचे गूढ म्हणून पोलिस या घटनेकडे पाहत असतानाच, मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या चेतन चौधरीचे वडील बाबूलाल चौधरी आपल्या मुलाच्या बचावासाठी पुढे आले आहेत. आपला मुलगा पूर्णपणे निर्दोष असून त्याला या प्रकरणात खोट्या आरोपाखाली गोवले जात असल्याचा दावा बाबूलाल चौधरी यांनी केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी पोलिसांचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. मी जेव्हा पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा चेतनने मला स्पष्टपणे सांगितले की त्याने केतनला दरीत ढकलले नव्हतं, असा दावा बाबूलाल चौधरी यांनी केलाय.

मी त्याला धक्का दिला नाही, तिथे उभा नव्हतोच

” मी केतनला धक्का दिलाच नाही .  घटना घडली तेव्हा तो बऱ्याच अंतरावर उभा होता. दुसरी आरोपी सिया गोयल ही केतनच्या सर्वात जवळ उभी होती, असं चेतनने मला आणि कुटुंबाला सांगितलं” असा दावा बाबूलाल यांनी केला. मात्र मात्र, सियाने केतनला ढकलले असा थेट आरोप करणे त्यांनी टाळले. माझा मुलगा जे काही बोलला होता, तेवढेच मी सांगतोय असं त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सिया गोयलची आपल्याशी यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती आणि पोलीस व्हॅनमधअयेच मी तिवा पहिल्यांदा पाहिलं असंही चौधरींनी स्पष्ट केलं.

बिझनेस मीटिंगचं कारण सांगून घरातून निघाला होता चेतन

बाबूलाल चौधरींच्या सांगण्यानुसार, 18 जून रोजी (ज्या दिवशी केतनाच मृत्यू झाला) चेतनने आपल्या आईला आपण बिझनेसनिमित्त एका महत्वाच्या मीटिंगसाठी जात असल्याचे सांगितलं होतं, दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान परत येईन, असंही तो म्हणाला होता . माझा मुलगा अत्यंत सरळमार्गी आणि सुसंस्कृत आहे, तो दररोज दुकानात येऊन कामात मदत करायचा असंही बाबूलाल म्हणाले.

त्यांनी पोलिसांच्या वागणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चेतनला रात्री ताब्यात घेतलं असता आपली दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सुरुवातीला पोलिसांनी हे आर्थिक फसवणुकीचे प्रकरण असल्याचे सांगून त्याला दोन तासांत सोडले जाईल असं म्हटलं होतं, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समजले की त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.