पद्मश्री सोहळ्यात आर. माधवनचा हँडसम जेंटलमन लूक; हातातल्या 40 लाखांच्या भारतीय घड्याळावर खिळल्या नजरा, असे जगात फक्त 10 लक्झरी वॉच
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 25, 2026 03:13 PM

R. Madhavan Wears Rare 40 Lakh Watch: भारतीय सिनेसृष्टीतील (Indian Film Industry) महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेता आर. माधवनला (Actor R. Madhavan) मंगळवारी 'पद्मश्री' पुरस्कारानं (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आलंय. राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते आर. माधवनला (R. Madhavan) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात माधवन अत्यंत प्रभावी दिसत होता, त्याच्या हँडसम अशा जेंटलमन लूकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पण, यासगळ्यात लक्षवेधी ठरलं ते आर. माधवच्या हातातलं घड्याळ. बरं हे काही सामान्य घड्याळ नव्हतं, त्यानं टायटनच्या 'नेबुला' (Nebula) कलेक्शनमधलं 'जलसा' (Jalsa) हे लिमिटेड-एडिशन घड्याळ घातलं होतं, जे अत्यंत खास आणि महागडं मानलं जातं. माधवनच्या घड्याळावर सर्वांच्या नजरा खिळल्या.

आर. माधवनच्या लग्झरी घड्याळानं वेधलं लक्ष (R Madhavan Wears Titan Nebula Collectio Rare Watch)

पद्म पुरस्कार स्विकारताना, आर. माधवन यानं नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेझर वेअर केलेला. त्यासोबत विना-फ्रेमचा चष्मा, सोन्याची चैन आणि तपकिरी लेदरचा पट्टा असलेलं घड्याळ... यामुळे त्यांच्या लूकला एक वेगळीच शोभा आलेली. घड्याळांची आवड असलेल्यांनी त्याच्या या महागड्या घड्याळाची नेटकऱ्यांकडून विशेष दखल घेतली गेली. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, या घड्याळाची किंमत 40 लाख रुपये इतकी आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarita Birje Madhavan (@msaru15)

आर. माधवननं घातलेल्या घड्याळाची किंमत किती? (R Madhavans 40 Lakhs Rare Watch)

आर. माधवन यांच्याकडील आलिशान घड्याळ म्हणजे, 'टायटन नेब्युला जलसा फ्लाइंग टर्बिलॉन' (Titan Nebula Jalsa Flying Tourbillon). हे टायटनच्या प्रीमियम 'नेब्युला कलेक्शन'मधील एक उत्कृष्ट लग्झरी वॉट. 18-कॅरेट रोझ गोल्ड केसपासून बनवलेलं हे घड्याळ भारतीय कारागिरी आणि आधुनिक घड्याळ-निर्मितीचा एक अप्रतिम संगम आहे. यातली सर्वात वैशिष्ट्यपूर् बाब म्हणजे, हातानं रंगवलेला मार्बल डायल, जो जयपूरच्या प्रसिद्ध 'हवा महाल'पासून प्रेरित आहे. राजस्थानी लघुचित्रकलेच्या (मिनिएचर पेंटिंग) शैलीत केलेले याचे बारकावे, या घड्याळाला सर्वोत्कृष्ट बनवतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by WatchTime India (@watchtimeindia)

जगभरात केवळ 10 लोकांकडेच 'लिमिटेड-एडिशन' घड्याळ

आर. माधवनच्या हातातलं 'टायटन नेब्युला जलसा फ्लाइंग टर्बिलॉन' हे लग्झरी वॉच भारतीय ब्रँडच्या सर्वात खास आणि दुर्मिळ घड्याळांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात या घड्याळाचे केवळ 10 युनिट्स तयार करण्यात आलेत, ज्यामुळे हे घड्याळ वॉच कलेक्टर्ससाठी एक्सक्लूसिव्ह बनलंय.

144 components, 14 jewels: R Madhavan flaunts Rs 40 lakh Indian-made watch  at Padma Shri ceremony - Lifestyle News | The Financial Express

दरम्यान, आर. माधवनच्या वर्कफ्रंटबाबक बोलायचं झालं तर, तो लवकरच 'अल्फा' (Alpha) सिनेमात झळकणार आहे, ज्यामध्ये त्याचा एक छोटासा कॅमिओ आहे. आलिया भट्ट, शर्वरी वाघ, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा 3 जुलै 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, आर. माधवन याचं 'जी.डी.एन.' (G.D.N.) आणि 'अधिष्ठशाली' (Adhishthashali) हे सिनेमेही निर्मितीच्या विविध टप्प्यांवर आहेत.

Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.