Nasrapur Case Verdict: नसरापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला आज(गुरूवारी, ता25) पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. नसरापूर प्रकरणात (Nasrapur Rape Case) विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करुन या खटल्याची विक्रमी वेळेत सुनावणी झाली होती. आज न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) दोषी असल्याचा निकाल दिला. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षा़ंच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. (Pune Crime Nasrapur Case ) तर या प्रकरणी सरकारी वकिल आणि आरोपीचे वकिल यांचा देखील युक्तीवाद झाला, कोर्टाने दोषी ठरवलं त्यानंतरही आज आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद करताना भीमराव कांबळेच्या बचावासाठी प्रयत्न केला, यावेळी ते म्हणाले, स्वत: आरोपी या घटनेमुळे धक्क्यात असल्याचं दिसून येत आहे, आणि तो ६५ वर्षांचा वृद्ध असल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं. त्याचबरोबर तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप ही या आरोपीला योग्य शिक्षा राहिलं असा दावा केला आहे.
तर आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लगत नसल्याचा युक्तीवाद केला आहे. त्याचबरोबर आऱोपीच्या वकिलांनी तो स्वत: या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो ६५ वर्षांचा वृद्ध असल्याचा युक्तीवाद केला आहे. तो वृद्ध असल्याने इतका क्रुर गुन्हा करु शकतो का? असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप ही या आरोपीला योग्य शिक्षा राहिल असा दावा केला आहे.
आरोपीला सात मुली आहेत, पत्नी आहे, मात्र कोणीही त्याची बाजू घ्यायला पुढं आलेलं नाही. समाजाने या आरोपीचे अस्तित्व नकाराले आहे. न्यायालयाने या आरोपीला विचार करायला वेळ दिला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला काही प्रश्न विचारले मात्र त्यावर तो निरुत्तर झाला. न्यायालयाने आरोपीला अनेकदा प्रश्न विचारले मात्र त्यावेळी तो गप्प राहिला. आरोपची मेटंल हेल्थ आणि पोटंन्सी रिपोर्ट हे सिद्ध करतोय की तो मेंटली फीट आहे आणि तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम आहे.
आरोपी भीमराव कांबळेला त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप झाल्याचे त्याच्या शरीरबोलीवरून (बॉडी लँग्वेज) किंवा देहबोलीवरून अजिबात जाणवत नव्हते.
अगदी न्यायालयात दोषी ठरवल्यानंतर आणि निकालपत्राचे वाचन करतानाही त्याच्या चेहऱ्यावरील एक रेषदेखील हलली नाही, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.
हा आरोपी अतिशय सामान्यपणे वागत होता. अशा प्रकारची कृत्य करणारा आणि पश्चात्ताप नसलेला व्यक्ती समाजासाठी अत्यंत घातक आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
आरोपी हा इतका घृणास्पद आहे की त्याच्या स्वतःच्या ७ मुली, मुलगा आणि पत्नी यांपैकी एकही जण त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याची बाजू घेण्यासाठी कोर्टात आला नाही. यापूर्वी दोन वेळा संधी देऊनही तो न सुधारल्यामुळे समाजाने आणि त्याच्या कुटुंबाने त्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले होते.
आरोपीच्या वैद्यकीय चाचण्यांचे (पोटन्सी टेस्ट आणि मेंटल हेल्थ टेस्ट) रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असून लैंगिक कृत्य करण्यास सक्षम आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतीही दया दाखवता येत नाही.
गुन्हा सिद्ध झाल्याचे खडसावले: न्यायाधीशांनी आरोपीला कडक शब्दांत खडसावले आणि सांगितले की, "आता तू जो काही बचाव सांगत आहेस तो इतिहास झाला आहे, कारण तुझ्यावरचा गुन्हा आता सिद्ध झाला आहे".
बचाव करण्याची संधी संपली: "तू आता स्वतःचा कोणताही बचाव करू शकत नाहीस, त्यामुळे तुला आता कोणती शिक्षा देण्यात यावी असे तुला वाटते?" असा प्रश्न न्यायाधीशांनी थेट आरोपीला विचारला.
न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न: आपल्या देशात अशी कृत्य होऊनही जर आरोपींना शिक्षा झाली नाही, तर समाजाचा न्यायसंस्थेवरचा विश्वास उडू शकतो, अशी चिंता न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात व्यक्त केली.
मुलींच्या सुरक्षेचा संदेश: समाजात महिला आणि मुली सुरक्षित आहेत हा संदेश जाण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने म्हटले.
सुरुवातीला मौन बाळगले: जेव्हा न्यायाधीशांनी त्याला १ मे रोजी घडलेली घटना आठवून "तुला पश्चात्ताप होतो का?" असे विचारले, तेव्हा आरोपी कोर्टात पूर्णपणे गप्प (निरुत्तर) राहिला.
खोटा बनाव रचला: पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी खोटा बनाव रचत म्हटले की, "मी हे कृत्य केलंच नाही. मी त्या मुलीला काठीशेव खायला देण्यासाठी घेऊन जात होतो आणि अचानक माझा पाय घसरल्यामुळे मी पडलो, त्यातच मुलीच्या डोक्याला मार लागला".