आजच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे याला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी विचारले की, 'तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची?', असा सवाल न्यायाधीशांनी विचारला. त्यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप फेटाळले. तो म्हणाला की, "मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती", असे भीमराव कांबळे याने म्हटले. यावर न्यायाधीश भीमराव कांबळेला म्हटले की " आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी " . न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले.