तुम्हाला माहितीये असं कोणतं फळ आहे, जे जगात सर्वात जास्त खाल्लं जातं?
GH News June 25, 2026 11:12 PM

प्रत्येक फळाचं त्याचं वेगळं महत्त्व असतं. फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, कारण त्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात. डॉक्टर देखील आपल्या आरोग्यानुसार आपल्याला कोणतं फळ गुणकारी आहे. याबद्दल सांगत असतात. यामध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला तर डॉक्टरच देतात. आपण दररोज सफरचंद, आंबे आणि टरबूज यांसारखी विविध प्रकारची फळे खातो. पण तुम्हाला माहित आहे का की जगात कोणते फळ सर्वाधिक खाल्लं जातं? लोक कोणतं फळ सर्वाधिक खातात याबद्दलची रंजक माहिती जाणून घ्या.

जगात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ कोणतं आहे?

जगात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ केळी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांना देखील केळी प्रचंड आवडतात. वर्षभर उपलब्ध आणि स्वस्त असल्यामुळे केळी हे सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ आहे. स्मूदी, गोड पदार्थ, चिप्स, बेकरी उत्पादनं आणि लहान मुलांचे अन्न यांसारखे विविध पदार्थ बनवण्यासाठीही केळीचा वापर केला जातो.

केळी हे जगातील सर्वात लोकप्रिय फळ का आहे?

केळींच्या लोकप्रियतेमागील खरं कारण म्हणजे त्यांची चव, पोषणमूल्ये, परवडणारी किंमत… परवडणारी किंमत, सहज उपलब्धता आणि भरपूर पोषक गुणधर्मांमुळे जगभरात केळी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना केळी खायला आवडतात. तसेच, नैसर्गिक गोडवा आणि त्वरित ऊर्जा देण्याच्या क्षमतेमुळे बहुतेक लोक हेच फळ खाणं पसंत करतात.

जगात सर्वाधिक केळी कोणत्या देशात पिकतात ?

भारत हा केळीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. केळी उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील अनुकूल हवामान आणि मोठ्या प्रमाणात असलेली लागवडीयोग्य जमीन केळीच्या मोठ्या उत्पादनास हातभार लावतात. भारतासोबतच चीन, इंडोनेशिया, ब्राझील आणि इक्वेडोर यांसारखे उष्णकटिबंधीय देशही केळी पिकवतात आणि जागतिक बाजारपेठेत त्यांची निर्यात करतात.

केळ्यांचे फायदे काय आहेत?

केळी हे अनेक फायदे असलेले एक पौष्टिक फळ आहे. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, सी, फायबर आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. केळ्यांमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. केळी रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता टाळता येते आणि हाडे देखील मजबूत होतात. पण तुम्हाला कोणती समस्या असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.