केतनचं स्थळ येताच सियाने सोशल मिडीयावर स्टॉक केलं; सगळे व्हिडीओ पाहिले अन्... वडिलांनी सांगितला तो किस्सा
अंकिता खाणे June 26, 2026 05:13 PM

पुणे: पुण्यातील बहुचर्चित आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्येप्रकरणाला आता एक अत्यंत नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा (Ketan Agarwal Death Case) तपास करताना पुणे पोलिसांनी आता आपला मोर्चा आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाकडे वळवला आहे. पोलिसांनी थेट सियाच्या भावाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी (Ketan Agarwal Death Case)  सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्याचा अधिकृत जबाब नोंदवला जाणार असल्याने या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.(Ketan Agarwal Death Case)

Ketan Agarwal Death Case : आयसीयूमधून बाहेर येताच वडिलांनी दिली मोठी माहिती!

दुसरीकडे, आपल्या मुलीच्या या कृत्यामुळे जबर धक्का बसलेले सियाचे वडील अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालच त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून (ICU) बाहेर काढून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. जनरल वॉर्डमध्ये येताच सियाच्या वडिलांनी माध्यमांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, ज्यावरून सियाच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे.

Ketan Agarwal Death Case : "केतनचे भाषणाचे व्हिडीओ पाहून तिनेच लग्नाला होकार दिला होता!"

सियाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सियावर या लग्नासाठी घरून कोणतेही प्रेशर (दबाव) नव्हते. तिने स्वतःच्या मर्जीनेच केतनला पती म्हणून पसंत केले होते. जेव्हा केतन अग्रवालचे स्थळ त्यांच्याकडे आले, तेव्हा सिया प्रचंड आनंदी होती. तिने सुरुवातीला केतनला फोटोमध्ये पाहिले आणि तो तिला आवडला.

एवढ्यावरच न थांबता सियाने स्वतः इंटरनेटवर जाऊन केतनची आणि त्याच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती काढली. वेबसाइटवरून माहिती वाचल्यानंतर तिने यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर केतनच्या भाषणाचे व्हिडीओ शोधून काढले. तिने केतनचा प्रत्येक व्हिडीओ अतिशय बारकाईने पाहिला होता. केतनचे ते विचार आणि बोलणे पाहून ती कमालीची प्रभावित झाली होती. "हा किती चांगला मुलगा आहे, मला तो खूप पसंत आहे," असे तिने स्वतः अत्यंत आनंदाने आपल्या वडिलांना सांगितले होते. सियाच्या या उत्स्फूर्त आणि आनंदी संमतीनंतरच तिच्या घरच्यांनी अग्रवाल कुटुंबाशी लग्नाची बोलणी पुढे चालवली होती.

Ketan Agarwal Death Case : अग्रवाल कुटुंबालाही होती 'त्या' हालचालींची माहिती!

सियाच्या वडिलांनी पुढे सांगितले की, सिया लग्नाआधी केतनबद्दल किती उत्सुक होती, याची माहिती तिचे सासर म्हणजेच अग्रवाल कुटुंबालाही मिळाली होती. केतनच्या कंपनीच्या वेबसाइटवरून अग्रवाल फॅमिलीला कळाले होते की, 'सिया' नावाच्या एका मुलीने त्यांच्या साईटवर वारंवार येऊन केतनबद्दल आणि व्यवसायाबद्दल सखोल माहिती सर्च केली आहे.

दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर स्वतः अग्रवाल फॅमिलीने याबद्दल कौतुकाने सांगितले होते. लग्नाआधी दोघांचे एकमेकांबद्दल इतके चांगले संबंध होते आणि सिया केतनसाठी एवढी वेडी होती, "पण अचानक असं काय घडलं? तिच्या मनात काय आलं? हे त्या देवालाच माहिती," असे म्हणत सियाचे वडील रुग्णालयातील खाटेवरच अत्यंत भावूक झाले. या प्रकरणात आता सियाच्या भावाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ketan Agarwal Death Case : केतनच्या आयुष्यातील 'ती' शेवटची 75 मिनिटं

लोहगडाच्या पायथ्याला.... घरातून आठ वाजता निघालेले केतन आणि सिया आलिशान गाडीतून 9 वाजून 20 मिनिटांनी पोहचले.  तिकीट घर, इथल्या सीसीटीव्हीत सिया आणि चेतनचे हावभाव कैद झाले, वेळ 9 वाजून 43 ते 9 वाजून 45 मिनिटांची... चेतनचा हुडीतील फोटो, सिया- केतनने तिकीट काढलं, पण चेतन तिकीट न काढताच पुढं गेला. 10 वाजून 5 मिनिटांनी सिया आणि केतन गडावर पोहचले, केतन ट्रेकिंगचा आनंद घेत होता, सियाच्या मनात वेगळंच सुरु, तर मृत्यूच्या रूपाने चेतन काही फुटांवरून पाठलाग करत होता. 15 मिनिटं लोहगडाच्या कानाकोपऱ्यातून निर्मनुष्य ठिकाणी केतनला घेऊन सिया पोहचली. वेळ 10 वाजून 25 मिनिटांची. या घटनास्थळाची तिने आधीचं रेकी केली होती. मागे चेतन दबा धरुन बसला होता. फोटोची पोज देत असताना दोघांमध्ये झटापट, मग चेतन येतो आणि केतनला दरीत ढकलून दिलं जातं. अपघाताचा बनाव रचला जातो, मग बिंग फुटते. केतन शेवटच्या 75 मिनिटांत आयुष्याची बरीचं स्वप्न पाहतो. मात्र ही सर्व स्वप्न अधुरी राहतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.