आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशा मुक्ती पंधरवडा
esakal June 26, 2026 10:45 PM
NSK26H22552 नंदुरबार : नशामुक्ती पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नंदकिशोर सूर्यवंशी, अविनाश सोनवणे, सुंदरसिंग वसावे, विवेकानंद चव्हाण, डॉ. चंद्रकांत जोशी, ॲड. सीमा खत्री, डॉ. मधुकर देसले. --- आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्ती पंधरवड्याचा समारोप नंदुरबार, ता. २६ : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती पंधरवडा साजरा करण्यात आला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, आरोग्य रुग्णालय, पोलिस विभाग, अंगणवाडी, तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जिल्हा परिषद, विधिसेवा प्राधिकरण, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक आदी ठिकाणी व्यसनमुक्तीपर जनजागृती करण्यात आली. यानिमित्त व्यसनमुक्तीवर माहितीपुस्तिका वाटप करण्यात आल्या. व्यसनमुक्तीबाबत पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, अमली पदार्थांची होळी, व्यसनमुक्ती रॅली आयोजित करण्यात आली. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल रुग्णांची आरोग्य तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने व्यसनमुक्ती पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास ॲड. महाजन, ॲड. सीमा खत्री, ॲड. बिरारे, ॲड. वसावे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ॲड. बिरारी यांनी मार्गदर्शन केले. व्यसनमुक्तीचा संकल्प करू या, असा संदेश त्यांनी दिला.ॲड. सीमा खत्री यांनी, मानवी समाज आणि देशाला सक्षम करण्यासाठी व्यसनमुक्त राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, निरीक्षक अविनाश सोनवणे, सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, विवेकानंद चव्हाण, डॉ. चंद्रकांत जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. नितीन सनेर यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मधुकर देसले यांनी आभार मानले. तेजस देसले, शीतल नुकते, सुभाष कोकणी, लक्ष्मण बागूल, कल्पना वळवी, मधू सोनेरी आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.