पाकिस्तान रेंजर्स कॅम्पजवळ आत्मघातकी हल्ला, स्फोट आणि गोळीबाराने परिसर हादरला
Marathi June 28, 2026 03:24 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानमधील कराची शहरात एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील रेंजर्स कॅम्पजवळ एक भीषण आत्मघातकी हल्ला झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर स्फोटांच्या आणि गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेला. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या भीषण हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडल्याची तसेच अनेक नागरिक व सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. स्फोटानंतर परिसरात मोठी घबराट पसरली असून, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.