केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकराच्या मदतीने केतनची हत्या केली. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दर्शवण्यात आले. जसा जसा पोलिस तपास पुढे गेला, तशी धक्कादायक गुपिते उघड होत आहेत. केतन सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला, असे सियाने सांगितले होते. मात्र, सियाने आपला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने 400 फूट खोल दरीत केतनला धक्का दिला. त्यानंतर 15 मिनिटे ती एकाच जागी बसून राहिली. त्यानंतर तिने चेतन सुरक्षित निघाल्याचे कळताच खोटा नाटक सुरू केला. गेल्या काही दिवसांपासून सियाकडून केतनला मारण्यासाठी प्रयत्न केला जात होता. यापूर्वीही तिने लोहगडावरच केतनला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनने झाडाला धरल्यामुळे तो वाचला. त्यावेळी तिने साप दिसल्याचा बहाना केला. सियाची कसून चाैकशी केली जात आहे.
पोलिसांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार देखील मिळाला. आता मोठी माहिती पुढे येत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर घटना रिक्रिएशन करण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याला लोणावळा पोलीस लोहगडावर घेऊन गेले आहेत. लोहगडावर केतनच्या हत्येची घटना कशी घडली नक्की कोणी काय केला होत, या सगळ्या संदर्भात या आरोपींकडून माहिती घेतली जात आहे.
नेमकी त्या दिवशी त्या क्षणी घटना कशी घडली हे रिक्रेट करण्याकरता पोलीस दोन्ही आरोपींसह लोहगडावर गेलेले आहेत. सकाळी 6 च्या सुमारास लोहगडावर पोलीस ह्या दोन्ही आरोपींना घेऊन गेलेले आहेत. ह्या प्रोसेसमध्ये हत्येचा सीन क्रिएट केला जातो, नेमके कोणी काय केले केतन किती वाजता तिथे पोहोचला, चेतन केव्हा तिथे होता या सगळ्याविषयीची माहिती सीन रिक्रिएशनद्वारे घेतली जाते.
आज लोहगड सर्वसामान्यासाठी पोलिसानी बंद केला आहे. कुठल्याही व्यक्तीस गडावर जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलिस सर्व घटनाक्रम पुन्हा पाहणार आहेत. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. सर्व प्लॅनिंग नियोजित होते. मात्र, पोलिसांनी तपासात सर्वकाही पुढे आणले. सियाच्या आई वडिलांचीही चाैकशी केली जात आहे.