मोठी बातमी! भारतात होऊ शकतात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी, थेट या देशांमध्ये..
Tv9 Marathi June 29, 2026 12:45 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला होता. तब्बल 3 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू होते. यादरम्यान फक्त दोनच देश नाही तर जगातील अनेक देश अडचणीत अडकली होती. इराणने होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली. अखेर दोन्ही देशात युद्धविराम करार जाहीर झाले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तणाव पुन्हा एकदा वाढल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर इराणनेही खाडी देशात अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला केला. पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढले. इराण आणि अमेरिका युद्धात सतत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. जगातिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमत वाढल्यानंतर भारतातही चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली.

इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर जागतिक बाजाराज कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती घसरताना दिसल्या. आता एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. मात्र, भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती अजूनही कमी केल्या नाहीत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले.

भारतात देखील लवकरच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तशी कोणतीही घोषणा केंद्र सरकारने केली नाही. इराण आणि अमेरिका यांच्यात तीन महिने युद्ध सुरू होते. या तीन महिन्यात 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले. ज्याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसताना दिसला. मात्र, आता पेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे पेट्रोल 102.12 प्रति लीटर तर डिझेल 95.20 प्रति लीटर विकले जात आहे. ज्यावेळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या, त्यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवलेले नव्हते. यादरम्यान तेल कंपन्यांना तब्बल एक लाख करोडचे नुकसान सहन करावे लागले होते. आता तेच नुकसान भरून काढले जात आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव लगेचच भारतात शेजारी देशांसारखे कमी करण्यात आली नाहीत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.