विशाल अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी विशाल अग्रवाल याला त्याचीच होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी खोल दरीत ढकलून दिले. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, जसा जसा पोलिस तपास पुढे आला, ज्याने एकच खळबळ उडाली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांना पोलिसांनी अटक केली. चेतन चाैधरी हा सियाचा भाऊ साहिल याचा मित्र होता. दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्यासोबत ठरवले. या लग्नाबद्दल सियाला कुटुंबियांनी अनेकदा विचारले. यावर तिने मी खुश असल्याचे वारंवार सांगितले. हेच नाही तर ती केतन अग्रवाल याच्यासोबत फिरायलाही जात. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा लेक होता. आता केतनच्या हत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणात आता मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या लग्नाचे प्री – वेडिंग शुट बाली येथे होणार होते. मात्र, सियाला बालीला जायचे नव्हते. यादरम्यान तिने केतनचा पासपोर्ट मुद्द्याम गहाळ केला. कॅब ड्रायव्हर वैभव जाधव यांनीच केतन, सिया आणि त्यांच्या बहिण भावांना पुण्याहून मुंबईला सोडले, यादरम्यान नक्की काय घडले, याबाबत त्यांनी खुलासा केला.
कॅब ड्रायव्हर वैभव जाधव यांनी म्हटले की, सिया आणि केतन अग्रवाल हे प्री – वेडिंग शुटसाठी बालीला जाणार होते. यासाठी त्यांनी पुण्यातून एक गाडी बुक केली होती. बालीला जाण्यासाठी सिया राजी नव्हती, ती गाडीतही बसण्यासाठी तयार नव्हती. सियाचा भाऊ साहिल हिने तिला बळजबरी हाताला धरून गाडीत बसवले. सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यात पुणे ते रावेतदरम्यान गाडीमध्ये वाद झाला होता.
किवळे लोढा येथून केतन अग्रवाल आणि अजून एकाला घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो. पुढ एक फूड कोर्टमध्ये चहा नाष्टा करण्यासाठी आम्ही थांबलो. तेव्हा सिया कशाच्या तरी बहाण्याने पुन्हा गाडीकडे आली गाडीतून काही सामान काढून खिशात ठेवले. ही बाब निदर्शनात आली होती. पुढे त्यांना सर्वांना मुंबई एअरपोर्टवर सोडले तेव्हा पुन्हा काही वेळात केतनचा फोन आला की, माझं काही सामान गाडीत राहिल आहे. माझा पासपोर्ट राहिला आहे.