गोपाल मोटघरे, साम टीव्ही
पुणे: लोहगड किल्ल्यावर खून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. केतनचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचे केतनच्या विरहाने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी देवीचंद किसनलाल अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांवर मोठा आघात झाला होता.
साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोयया धक्क्याचा सर्वाधिक परिणाम घरातील ज्येष्ठ सदस्य देवीचंद अग्रवालयांच्यावर झाला. सततच्या मानसिक तणावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थनमिळालेल्या माहितीनुसार देवीचंद अग्रवाल हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसुधारत असतानाच 18 जून रोजी त्यांचा नातू केतन याची लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले असताना त्याला ढकलून हत्या करण्यात आली. आपल्या डोळ्यादेखत लाडका नातवाचा खून झाल्याचं कळताच आजोबा देवीचंद अग्रवाल यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचं कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. केतनची हत्या होऊन काही दिवस होताच देवीचंद अग्रवाल यांचं निधन झाल्याने परिवारावर दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डेया घटनेमुळे अग्रवाल कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. देवीचंद अग्रवाल यांची अंत्ययात्रा दि.(5) रोजी सकाळी १० वाजता लोढा बेलमांटो सोसायटी येथून निघणार असून, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.