England vs India, 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात शनिवारी (४ जुलै) मँचेस्टरमध्ये टी२० मालिकेचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ४ विकेट्सने विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण असे असले तरी या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू अक्षर पटेलने (Axar Patel) मोठा विक्रम करत इतिहास घडवला आहे.
IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजयया सामन्यात भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर फिल सॉल्ट आणि जॉस बटलर पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगविरुद्ध खेळताना बाद झाले. दोघांनाही अर्शदीपने शून्यावर माघारी धाडले. पण नंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने आक्रमक खेळ केला आणि डाव पुढे नेला होता.
त्याने जेकब बेथलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. पण अखेर त्याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. अनुभवी अक्षर पटेलने टाकलेल्या फिरकीच्या जाळ्यात ब्रुक अडकला आणि ईशान किशनकडे झेल देत बाद झाला. त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली.
ब्रुकची ही विकेट अक्षरसाठी विक्रमी ठरली. त्याच्यासाठी ब्रुक ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील १०० वी विकेट ठरली. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० विकेट्स घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला, तर पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
यापूर्वी १०० विकेट्सच्या जवळ युझवेंद्र चहल हा फिरकीपटू होता, पण तो २०२३ पासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने ८० चेंडूत ९६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कुलदीप यादवने ५४ टी२० सामन्यात ९५ विकेट्स घेतल्या आहेत.
१३४ विकेट्स - अर्शदीप सिंग (८८ सामने)
१२१ विकेट्स - जसप्रीत बुमराह (९५ सामने)
११४ विकेट्स - हार्दिक पांड्या (१३८ सामने)
१०० विकेट्स - अक्षर पटेल (९८ सामने)
९६ विकेट्स - युझवेंद्र चहल (८० सामने)
९५ विकेट्स - कुलदीप यादव (५४ सामने)
दरम्यान ब्रुक बाद झाल्यानंतरही जेकब बेथल आणि टॉम बँटन यांनी ६७ धावांची भागीदारी केली. बँटन ३९ धावांवर बाद झाला. पण बेथलने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने १९१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने १९ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केले. भारतासाठी अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, भारताने २० षटकात ७ बाद १९० धावा केल्या. भारताकडून ईशान किशनने ४९ धावांची खेळी केली, तर अभिषेक शर्माने ४३ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने ३७ धावांची, तर तिलक वर्माने नाबाद २४ धावांची खेळी केली. इंग्लंडकडू सॅम करनने ३ विकेट्स घेतल्या.