मुंबईतील एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव
वेदांत नेब July 05, 2026 12:43 PM

Asiatic Society Election Results 2026 : मुंबईतील ऐतिहासिक ‘एशियाटिक’ सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलने (Asiatic Tomorrow panel) दणदणीत विजय मिळवला आहे. अध्यक्षपदी विनय सहस्रबुद्धे 506 पैकी 349 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी कुमार केतकर यांना 157 मते मिळाली. तर सचिवपदासाठी विवेक गुणपुले यांनाही 353 मतांसह विजय मिळाला. उपाध्यक्षपदाच्या चारही जागा, छाननी समितीच्या सातही जागा आणि व्यवस्थापन समितीच्या सहा जागांवरही टुमारो पॅनेलचेच उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे एशियाटिक सोसायटीवर टुमारो पॅनेलचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळत आहे.

Asiatic Tomorrow Panel: एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनलला 30 मान्यवरांचा पाठिंबा

दरम्यान, ४ जुलै रोजी पार पडलेल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील 'एशियाटिक टुमॉरो' पॅनलला विविध क्षेत्रांतील ३० मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दिला होता. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात एशियाटिक सोसायटीला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढून नवसंजीवनी देण्याची क्षमता 'एशियाटिक टुमॉरो' पॅनलकडे असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सोसायटीच्या मतदारांनी या पॅनलच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनावर संस्कृत आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक डॉ. सिद्धू डांगे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, लेखक अमीष त्रिपाठी, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, प्राध्यापिका मीना वैशंपायन, भन्ते राहुल बोधी, आयआयएम मुंबईचे संचालक मनोज कुमार तिवारी, डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे, माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत, डॉ. अनिरुद्ध पंडित, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, चित्रकार सुहास बहुळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सोमण, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, बुद्धिबळपटू घनश्याम गोखले, अभिनेते मनोज जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील एकूण 30 मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या. अशातच आता एशियाटिक सोसायटीवर टुमारो पॅनेलचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळत आहे.

एशियाटीक सोसायटी निवडणूक निकाल (Asiatic Society Election Results 2026)

अध्यक्ष

विनय सहस्रबुद्धे- 349- विजयी

कुमार केतकर - 157

सचिव

विवेक गणपुले 353- विजयी

सी. एम. पौळ- 149

एशियाटीक सोसायटी निवडणूक निकाल (Asiatic Society Election Results)

चार विजयी उपाध्यक्ष

चंद्रप्रकाश द्विवेदी

नितीश भारद्वाज

रमेश पतंगे

संजय देशमुख

2500 च्या आसपास मते असताना फक्त 506 जणांनी मतदान केलं

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.