पाकिस्तानमध्ये दोन परदेशी महिलांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की यामागे क्रिप्टोकरन्सीशी संबंधीत वाद असू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे गँगरेप प्रकरणात मुख्य आरोपी मुहम्मद रजा डार हा पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचा नातू असल्याचं सांगण्यात येतंय. पीडित महिलेनं कोर्टात जबाब देताना दावा केला की सुटकेच्या बदल्यात मुख्य आरोपीला एक लाख अमेरिकन डॉलर देण्यात आले होते.
पाकिस्तानी मीडिया ग्रुप ARY न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेनं सांगितलं की, ती मैत्रिणीसोबत एका घरात मुक्कामाला होता. तेव्हा काही शस्त्रधारी लोक घरात घुसले. त्यांनी दोघांनाही एका खोलीत बांधून ठेवलं. त्यानंतर मुहम्मद रजा डार कम्प्युटर आणि क्रिप्टोकरन्सीचीच्या पैशांची मागणी करायला लागले. आरोपींनी पैशांचा कम्प्युटर कुठे आहे विचारलं असता हिरव्या रंगाच्या बॅगेत ठेवल्याचं सांगितलं.
Beijing News : चीनचे 'एक देश, एक भाषा'; वांशिक समूह कायदा लागू, अल्पसंख्यांकांची गळचेपीपीडितेनं आरोप केला की, ओलीस ठेवल्यानंतर डोक्यात वार करण्यात आले होते. हल्लेखोरांनी धमकी दिली होती की पैसे मिळाले नाही तर दोन्ही महिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या काळात दोन्ही आरोपींनी अत्याचार केले असाही आरोप महिलांनी केलाय.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं आरोप केला की मुहम्मद रजा डारने मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर पीडितेच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून पैसेही मागितले. सुरुवातीला कुणी उत्तर दिलं नाही. पण दुसऱ्या महिलेच्या आईने एक लाख अमेरिकन डॉलर पाठवले. पैसे मिळताच रजा डारने सोडण्याचा निर्णय घेतला. पण विमानतळावर नेत असताना मुख्य आरोपीच्या कारचा अपघात झाला आणि त्यामुळे दोन्ही महिलांना वाचवण्यात आलं.
पोलीस तपासात समोर आलं की, मुहम्मद रजा डारची दोन्ही महिलांसोबत सिंगापूरमध्ये ओळख झाली होती. तिघेही एका क्रिप्टोकरन्सी बिझनेसमध्ये पार्टनर होते. रजा डारनेच दोन्ही महिलांना पाकिस्तानला येण्यासाठी बिझनेस व्हिसाची सोय केली होती. नेदरलँड आणि व्हेनेझुएलाच्या दोन्ही महिलांचं २९ जूनला लाहोरमधून अपहरण झालं होतं. आतापर्यंत या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.