पुणे : तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधून अचानक प्रचंड वेगाने पाण्याचा फवारा उसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू असतानाच घटनादीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडेशहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर संबंधित रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. पुढील आठवड्यात या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याआधी नगरपरिषदेकडून शनिवारी नव्या पाण्याच्या टाकीतून पाणी सोडून पाईपलाईनची चाचणी घेण्यात येत होती.
Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन अचानक उसळला पाण्याचा फवाराचाचणी सुरू झाल्यानंतर काही क्षणांतच रस्त्याच्या मधोमध मोठ्या दाबाने पाण्याचा फवारा उसळला. हा फवारा इतका प्रचंड होता की, डांबरी रस्ता फुटल्याचा भास उपस्थितांना झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक हादरले, तर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
View this post on Instagram
या घटनेमुळे रस्त्याखालून टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरातील विकासकामांमध्ये कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनापूर्वीच चाचणीदरम्यान असा प्रकार घडल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Pune: खेडमध्ये मुंबईला जाणाऱ्या रेल्वेतून ३ प्रवाशांनी मारली उडी; महिलेचा मृत्यू, दोघे जखमी