Neymar retirement after Brazil World Cup exit: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेयमारज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. ब्राझीलला २०२६ फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ मध्ये सोमवारी नॉर्वेकडून २-१ ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ३४ वर्षीय फॉरवर्डने सामना संपताच काही क्षणांतच आपला निर्णय जाहीर केला. त्याने 'सेलेसाओ' संघासोबतच्या आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
सामन्यानंतर भावूक झालेला नेयमार मैदानावर रडताना दिसला. तो म्हणाला, “मी प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. आता ते संपलं. मी इथेच सुरुवात केली; इथेच शेवट केला.” त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यू जर्सीमधील मेटलाइफ स्टेडियमवर झाला आणि येथेच त्याने २०१० मध्ये अमेरिकेविरुद्ध ब्राझीलसाठी वरिष्ठ संघात पदार्पण केले होते.
नेयमारने फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली नसली तरी, तो ब्राझीलच्या महान खेळाडूंपैकी एक म्हणून राष्ट्रीय संघातून निवृत्त होत आहे. ८० आंतरराष्ट्रीय गोलसह तो ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून निवृत्त झाला आणि त्याने पेले यांचा विक्रम मोडला. १२९ सामन्यांसह तो काफूनंतर ब्राझीलचा दुसरा सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला.
Brazil vs Norway : नेयमार रडला, पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी! सामन्यानंतर नॉर्वे अन् Erling Haaland ची जखमेवर मीठ चोळणारी कृती Video Viralब्राझीलसोबतच्या या प्रवासात त्याने २०१३ चा फिफा कॉन्फेडरेशन्स कप जिंकला आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये संघाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली असली तरी, तो क्लब फुटबॉल खेळणे सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे.
नेयमारने चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत गोल केले आहेत आणि त्याने यासह पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यांनीही चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत गोल केले होते. या विक्रमात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ( ६) व अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ( ५) पुढे आहेत.