Amit Thackeray : नीचपणा चालू आहे, हा असा निर्लज्जपणा मी आधी..अमित साटम यांच्या हसण्यासह सर्व परिस्थितीवर अमित ठाकरेंच परखड भाष्य
Tv9 Marathi July 06, 2026 06:45 PM

मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांचं सत्र सुरु आहे. या दरम्यान भाजपचे मुंबई शहरध्यक्ष अमित साटम यांच्या असवंदेशनशीलतेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईत दुर्घटनांवर अमित साटम हसून बोलतायत असं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावरुन अमित साटम यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी अमित साटम यांचा समाचार घेतला आहे. “शॉक लागून दोन मुली रुणालयात आहेत. मुंबईला झाडं कोसळून माणसं मरत आहेत आणि भाजपचा शहराध्यक्ष हा माणूस साटम लोकांच्या मृत्यूवर हसतोय” अशा शब्दात अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. “नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतो याच्यापेक्षा घाण काय असू शकतं? सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे, मग का हसतायेत? कारण तीन वर्षे निवडणुका नाहीयत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितला” अशा शब्दात अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

“संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिव्या घातल्या, त्यावेळी तुम्ही त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स वर बहिष्कार टाकला हे बघून मला आवडलं. म्हणजे पत्रकारांमध्ये धमक आहे. माझी हीच विनंती आहे की ही हिंमत महाराष्ट्रासाठी सुद्धा दाखवा. अशा लोकांच्या नादी लागू नका, जाऊच नका त्यांच्याकडे. हे जे रस्त्यावर उतरून काम करत आहेत, तुम्ही नाही गेलात तर बघूया किती दिवस काम करतात. तुम्ही दाखवत आहात म्हणून ते करत आहेत. त्यांना लाजा नाही वाटत आहेत, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मनापासून” असं अमित ठाकरेम्हणाले.

ब्रिज कोसळला समजा तर तुम्ही हे सांगणार का, की हे आमचं ट्रायल आहे

“तो व्हिडिओ बघून तुम्हाला राग नाही आला का? एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय. संपूर्ण परिवारांच्या पाठीशी आम्ही आहोत. काय निर्लज्जपणा चालू आहे?. काय ऑपरेशन टायगर लावलय? लोक मरतायत आणि आपण पैसे घेऊन आमदार, खासदार फोडतोय. निर्लज्जपणे सगळं चालू आहे” अशा शब्दात अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. “मिसिंग लिंक वर मुख्यमंत्री म्हणतात हे ट्रायल एरर आहे. पहिल्या पावसात ट्रायल असतो. ब्रिज कोसळला समजा तर तुम्ही हे सांगणार का की हे आमचं ट्रायल आहे. आता आम्ही नवीन ब्रिज बांधू, आता आम्हाला आमच्या चुका कळल्या” अशा शब्दात अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.