आजचे पंचांग 7 जुलै २०२६! कालाष्टमी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि राशीनुसार महत्त्वाच्या सूचना
esakal July 07, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०६

☀️ सूर्यास्त – १९:१०

चंद्रोदय – २४:११

⭐ प्रात: संध्या – ०४:५४ ते ०६:०६

⭐ सायं संध्या – १९:१० ते २०:२२

⭐ अपराण्हकाळ – १३:५६ ते १६:३३

⭐ प्रदोषकाळ – १९:१० ते २१:२१

⭐ निशीथ काळ – ००:१६ ते ००:५९

⭐ राहु काळ – १५:५४ ते १७:३२

⭐ यमघंट काळ – ०९:२२ ते ११:००

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ११:०० ते १२:३८

अमृत मुहूर्त– १२:३८ ते १४:१६

विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४०

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०६:०६ ते ०७:५० | ११:०० ते १३:०४ | १५:४० ते १५:५४ | १८:१७ ते १९:१० | २१:२१ ते २३:३२

⚠️ कार्यनाशक वेळा – ०७:५० ते १०:२७ | १३:०४ ते १५:४० | १६:३३ ते १८:१७ | १९:१० ते २१:२१ | २३:३२ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: २४:१५ ते ०८-०७-२०२६ ०६:३८ | ओहोटी: ०८-०७-२०२६ ०६:३८ ते ०८-०७-२०२६ १३:०६ | भरती: ०८-०७-२०२६ १३:०६ ते ०८-०७-२०२६ १९:०२

ग्रहमुखात आहुती – गुरु (शुभ)

अग्निवास – पाताळी ०८:४५ पर्यंत नंतर पृथ्वीवर

️ शिववास – ०८:४५ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – सप्तमी (०८:४५ नं.) अष्टमी

वार – मंगळवार

नक्षत्र – उत्तराभाद्रपदा (११:५७ नं.) रेवती

योग – शोभन (१०:२२ नं.) अतिगंड

करण – बव (०८:४५ नं.) बालव

चंद्र रास – मीन

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – कालाष्टमी, सर्वार्थसिद्धियोग ११.५७ प., रवियोग ११.५७ प.

विशेषआकाशात सध्या एक अत्यंत दुर्मिळ, अनाकलनीय आणि तितकीच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सध्या आकाशात 'अतिचारी' गतीने धावत आहे. शनि महाराज मीन राशीत 'वक्री' होत आहेत. या दोन गोष्टींचा सामान्य जनांच्या दैनंदिन आयुष्यावर जो प्रभाव पडणार आहे, हे सांगणारा हा video विशेषतः "आर्थिक गुंतवणूकदारांसाठी" अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

या दोन खगोलीय घटनांमुळे पावसावर काय परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या दृष्टीने commodity market मध्ये कोणती हालचाल दिसून येणार आणि मुख्य म्हणजे शेअर बाजारावर काय परिणाम होणार याबदल सांगत आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे.

https://youtube.com/watch?v=t8x4YrfXXBM&si=Eb0tDNrVGkv3ODy9

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध

आजचे वस्त्र – लाल

स्नान विशेष – तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस पोवळे, गहूं, मसुर, गूळ, सुवर्ण, तांबडे वस्त्र, तांबें दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – आवळा, कडुलिंब

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी गूळ खाऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कन्या , तुळ , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.