पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal case) याच्या खूनातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांनी केतनच्या (Ketan Agarwal case) खूनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे. लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal case) याचा होणारी पत्नी सिया गोयल व तिचा बॉयफ्रेड चेतन चौधरी यांनी हत्या केली. याप्रकरणात दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर त्यांच्यामधील झालेले संभाषण तसेच चॅटिंग यामधून वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या मोबाईलमधील सहा ते सात महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली. (Ketan Agarwal case)
पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा, याविषयी माहिती घेतल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. चाकू किंवा इतर शस्त्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात व आरोपी पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. या गोष्टी घेण्यासाठी कुठेना कुठे जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर त्या लपवून ठेवाव्या लागतील. त्यामुळे कोणतेही शस्त्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून देऊन खूनाचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे. (Ketan Agarwal case)
लोहगड हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Siya Goyal and Chetan Chaudhari) यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते, असा दावा पोलिसांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी केली असता, त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा दावा करण्यात आला आहे.(Siya Goyal and Chetan Chaudhari) पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपासामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सिया गोयाल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशीदरम्यान; तसेच त्यांच्या मोबाइलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या दोघांनी कुटुंबीयांपासून लपवून लग्न केलं होतं, असेही तपासात समोर आले आहे. हा विवाह केतन आणि सिया यांच्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे गुपचूप लग्न नेमकं साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर, हे स्पष्ट झालेलं नाही.