वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये तर अनेकदा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात विविध समस्या येऊ शकतात. जसं की सर्व सुरळीत सुरू असतानाच तुमच्या आयुष्यात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. किंवा घरात अचानक आजारपण वाढतं. हातात आलेला पैसा टिकत नाही. तसेच अनेकदा काहीही कराण नसताना कुटुंबात कलह वाढतो. कुटुंब प्रमुखाचे घरातील इतर सदस्यांसोबत मतभेद होतात. पती-पत्नीचं पटत नाही, काही वेळा तर ही स्थिती अगदी घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते, या सर्व गोष्टींवर वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत.
आज आपण जर पती-पत्नीचं पटत नसेल, त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होत असतील तर त्यावर वास्तुशास्त्रामध्ये काय उपाय सांगण्यात आले आहेत, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अनेकदा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे घरात अशी परिस्थिती उद्भवू शकते, जर पती-पत्नीमध्ये सारखी भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम हा त्या घरातील मुलांवर देखील होतो, तसेच वस्तुशास्त्रानुसार ज्या घरात कायम कलह असतो, अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. पत्नी -पत्नीचं पटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.
घरात लावा हे दोन फोटो – वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीचं पटत नेसल, त्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील तर याच्या पाठिमागे त्या घरात निर्माण झालेला वस्तुदोष असू शकतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा फोटो लावावा. राधा कृष्ण यांचा फोटो लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, की बेडरूममध्ये कधीही एकटा कृष्ण किंवा एकट्या राधाचा फोटो लावू नये, तर बेडरूमध्ये राधा कृष्ण दोघांचाही एकत्र फोटो लावावा. तसेच घरात बदकाच्या जोडीचा फोटो लावणं देखील शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)