England vs India, 3rd T20I Marathi Update News : वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, संजू सॅमसनच्या संघातील स्थानावर धोका.. या सर्व चर्चांमध्ये भारतीय संघ तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी इग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या लढतीत इंग्लंडने विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता त्या पराभवाची परतफेड करण्याची भारतीय संघाची वेळ आहे आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिला विजय मिळवण्यासाठी संघ आतूर आहे.
वैभवला पदार्पणात मोठी खेळी साकारता आली नसली तरी त्याच्याकडून आज त्याची अपेक्षा आहे. अभिषेक शर्मालाही अपेक्षित सूर गवसण्याची प्रतीक्षा आहे, या परिस्थिती भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आज बदल होतील का, हा प्रश्न होताच. इंग्लंडने या सामन्यासाठी आधीच त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. नॉटिंगहॅम येथे भारत-इंग्लंड यांच्यात २०२२ मध्ये एकमेव ट्वेंटी-२० लढत झालेली आणि ती यजमानांनी जिंकली होती.
Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यातभारतीय संघाने यापूर्वी सलग ५ ट्वेंटी-२० सामन्यांत केव्हाच विजयाशीवाय राहिलेला नाही. २००९, २०१५, २०२१ व २०२६ ( आता) मध्ये भारत सलग चार सामन्यांत विजयावीना राहिला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली आज हार झाल्यास हा नकोसा विक्रमही नावावर होईल आणि भारत इंग्लंड ( २०१४) व दक्षिण आफ्रिका ( २०२०-२१) यांच्याशी बरोबरी करेल. भारताचा कर्णधार श्रेयसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवी बिश्नोईच्या जागी प्रिंस यादवचे पुनरागमन झाले आहे.
India Playing XI : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिंस यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी
England Playing XI : फिलिप सॉल्ट, जॉस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम कुरन, विल जॅक्स, लिएम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदील राशीद, जॉश टंग