E25 इंधनासाठी विलंब होण्याची योजना.
Marathi July 08, 2026 02:25 PM

सध्या 20 टक्के इथेनॉलचा होतोय वापर : मायलेज घटतेय, पार्ट्स खराब होत असल्याची तक्रार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या विरोधादरम्यान याचे प्रमाण वाढवून 25 टक्के करण्याची योजना सरकार तूर्तास लांबणीवर टाकू शकते. सरकार या स्थित्यंतराला घाईगडबडीत लागू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित पद्धतीने लागू करू इच्छिते. सरकारने यापूर्वी 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याची योजना आखली होती. परंतु कालमर्यादेपूर्वीच ई20 इंधन (80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल) पूर्ण देशात स्टँडर्ड पेट्रोलच्या रुपात लागू करण्यात आले आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी हेच पेट्रोल मिळत आहे.

जुन्या ई10 कंप्लायंट वाहनांमध्ये ई20 इंधनाचा वापर केल्याने फ्यूल सिस्टीमचे रबर पार्ट्स खराब होऊ शकतात असे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच एआरएआयच्या एका अध्ययनात दिसून आले आहे. सरकारने ई-20 चा निर्णय टाळण्यामागे देशभरातील वाहनमालक आणि कारउत्पादकांकडून मिळत असलेला फीडबॅक आणि चिंता कारणीभूत आहेत.

केवळ 3 वर्षांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग दुप्पट झाल्याने ग्राहकांनी वाहनांच्या मायलेजमध्ये मोठी घट झाल्याची तक्रार केली आहे. याचबरोबर जुन्या वाहनांचे इंजिन आणि फ्यूल सिस्टीमचे पार्ट्स खराब होण्याच्या भीतीमुळे सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.

वाहन मालकांना सर्वात मोठी तक्रार मायलेजवरून आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. याचबारेबर कुठल्याही पुरेशी तयारीशिवाय अचानक ई20 पेट्रोल आल्याने इंजिनच्या पार्ट्सना नुकसान पोहोचत असल्याची तक्रार जुन्या वाहनांचे मालक करत आहेत.

इथेनॉलच्या ‘कॅलोरिफिक व्हॅल्यू’ म्हणजेच ऊर्जाक्षमता शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत कमी असते. समान प्रमाणात ज्वलनावर इथेनॉल पेट्रोलइतकी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, यामुळे मायलेज कमी होऊ शकते. याचबरोबर इथेनॉल शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत अधिक तापमानवर जळत असते.

दुचाकींद्वारे परीक्षण

दुचाकी उत्पादकांनी इंजिन ड्यूरेबिलिटी टेस्ट केली आहेत. या टेस्ट्समध्ये इंजिन्समध्ये कुठलीच समस्या आढळून आलेली नाही. दुचाकी ई20 इंधनासोबत स्वीकारार्ह आढळून आल्या आहेत. ई20 इंधनाचा मेटॅलिक कंपोनेंट्सवर कुठलाच प्रतिकूल प्रभाव पडत नाही. याच्याउलट ई10 कंप्लायंट वाहनांमध्ये ई20 इंधन टाकल्यास सायलेंसरमधून होणारे उत्सर्जन निश्चित कायदेशीर मर्यादेच्या आत आढळून आले आहे.

सरकारचा दावा

मोठ्या प्रमाणावर झालेल्या परीक्षणात वाहनांना नुकसान पोहोचण्याचा कुठलाच पुरावा मिळालेला नाही असा दावा सरकारच्या वतीने काही तज्ञांनी पत्रकार परिषद घेत केला होता. या पत्रकार परिषदेत इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्तिका शुक्ला यांच्यासोबत वाहन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सामील झाले होते.

परीक्षण झाले का?

अहवालानुसार दोन कार उत्पादक कंपन्यांनी इंजिन ड्यूरेबिलिटी टेस्ट केली होती. यातील एका उत्पादकाच्या वाहनाच्या इंजिनने 400 तासांच्या परीक्षणानंतर कुठलीच समस्या दाखविली नव्हती आणि त्याची कामगिरी ई20 इंधनासोबत योग्य दिसून आली. तर अन्य  कार उत्पादकाप्रकरणी स्थिती वेगळी राहिली. दुसऱ्या इंजिनचे 809 तासांपर्यंत परीक्षण करण्यात आले असता त्याच्या एक्झॉस्ट वाल्वमध्ये ‘थर्मोमॅकेनिकल फेल्युयर’ दिसून आले. एक्झॉस्ट वॉल्व फेल होण्यामागे काही अन्य कारणेही असू शकतात असे जाणकारांचे सांगणे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.