ALSO READ: मुंबईनंतर आता पुण्यात सोमवार पेठ परिसरात बहुमजली इमारत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर खचला. कचरा डेपोच्या आवारात असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर हा कचऱ्याचा मोठा ढिगारा प्रचंड वेगाने कोसळला. अचानक हे सर्व घडल्यामुळे इमारतीत काम करणारे कर्मचारी अडकले.
ALSO READ: पुण्यातील पाटण दरड दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू
पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि बचावकार्य सुरु केला. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर पहिल्या मजल्यावर अजूनही काही लोक अडकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: आळंदीत अडकलेल्या भाविकांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका
पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
Edited By - Priya Dixit