एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
abp majha web team July 08, 2026 10:13 PM

'द पिरॅमिड स्कीम' ही वेब सीरिज झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाची भीषण किंमत कशी चुकवावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे. गोल्डी नावाचा एक तरुण आर्थिक अडचणींमुळे MLM (मल्टी-लेव्हल मार्केटिंग) स्कॅमच्या जाळ्यात अडकतो. पैशांच्या लालसेत सुरू झालेला त्याचा प्रवास पुढे मोठ्या संकटात बदलतो आणि त्याचा फटका त्याच्या कुटुंबासह अनेकांना बसतो. या मालिकेत शेखर सुमन, रणवीर शौरी, परमवीर सिंह चीमा, आशीष राघव, अंजन श्रीवास्तव आणि अल्फिया जाफरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून आजकाल गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा स्कॅमचं वास्तव समजून घेण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरू शकते.

'बॅड बॉय बिलियनेअर्स : इंडिया' ही एक माहितीपट (डॉक्यु-सीरिज) आहे. भारतातील काही गाजलेल्या उद्योगपतींच्या यशापासून ते त्यांच्या घसरणीपर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे. खऱ्या आर्काइव्ह फुटेज आणि मुलाखतींच्या माध्यमातून लालसा, आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचाराची कहाणी यात उलगडली जाते.

ही डॉक्यु-सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.देशातील मोठमोठ्या आर्थिक घोटाळ्यांमागील सत्य आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहण्यासारखी आहे.

'जामताडा : सबका नंबर आएगा' ही दोन सीझनची लोकप्रिय क्राइम थ्रिलर आहे. तांत्रिक ज्ञान असलेले काही शाळा सोडलेले तरुण एका छोट्याशा गावातून फिशिंग स्कॅम चालवतात. जसजसा हा घोटाळा वाढत जातो, तसतसे भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे संपूर्ण प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं.

ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.फोन कॉल, OTP आणि ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार कसे घडतात, यामागचं वास्तव जाणून घ्यायचं असेल तर ही मालिका नक्की पाहा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.