विलीनीकरण की NDAमध्ये जाणार? आमदारांच्या बैठकीत काय ठरलं? शरद पवार गटातील नेत्यानं सांगितली आतली गोष्ट
Saam TV July 09, 2026 01:45 AM
  • शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार की नाही याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

  • जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर तर्कवितर्क वाढले.

  • शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले.

महाविकास आघाडीमधीलशरद पवार राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाल्यानंतर एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांचा वणवा पेटला होता. शरद पवार आपल्या आमदारांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यात आज एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.

Sanjay Raut: शरद पवार कधीच एनडीएमध्ये जाणार नाहीत; संजय राऊतांचं वक्तव्य एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट का झाली?

शरद पवारयांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत चर्चा केली. तसेच शशिकांत शिंदे यांनी एनडीएत सहभागी होण्याबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सीमा प्रश्नासंदर्भात आमची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते. त्यामुळे सर्वांना भेटावं असं ठरलं. योगाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केबिन जवळ होती. म्हणूनच एकनाथ शिंदेची साहेबांची केबिनमध्ये बैठक घेतली. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिलं.

विलीनीकरणाबाबत चर्चा झाली?

बैठकीबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आमच्या पक्षाध्यांनीच सांगितले आहे की विलिनीकरणाची कुठलीही चर्चा सुरू नाहीये. तसेच NDA त जाण्याची चर्चा नाहीये. गेल्या तीन- चार दिवसापासून जी चर्चा सुरु आहे पण त्यात काहीच तथ्य नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो विलीनीकरणाची कुठलीही चर्चा झाली नाहीये. याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही.

आमदारांशी बैठक कोणत्या मुद्द्यावर झाली?

अधिवेशन सुरू असताना आमदारस खासदार यांच्यासोबत चर्चा करण्याचा पवार साहेबांचा मानस होता. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केलेले नाही. मात्र परिस्थितीची माहिती घेतली आहे. इकडच्या तिकडच्या विषयावर चर्चा झाल्याचं शशिकांत शिंदे म्हणालेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.