सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; खंडाळा आणि महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे १० जुलैपर्यंत बंद
Saam TV July 09, 2026 01:45 AM
  • सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • महाबळेश्वर, खंडाळा आणि वाई परिसरात मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका.

  • सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर १० जुलैपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू.

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी खंडाळा आणि महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यावेळी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

मोठी बातमी! नाशिकच्या सहा तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी

पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांनाबंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा करुण अंत

उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार धोम धरण, मेणवली घाट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड यांसह वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे, धरणे, नदीपात्रे आणि धबधब्यांच्याठिकाणी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत पर्यटकांना आणि नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी

सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या काळात घाटरस्त्यांवरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओढे, नाले व नद्यांना पूर आल्यास किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

बहुतेक ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. सोशल मीडिया, दवंडी, स्थानिक प्रसारमाध्यमे व व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून नागरिकांना हवामान अंदाज, धरण विसर्ग व नदीपात्रातील पाणीपातळीबाबत सातत्याने माहिती देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिलेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.