अस्सल गृहिणींनाच माहीत हा नुस्खा, पावसाळ्यात फ्रिजमध्ये ही वस्तू वाटीभर ठेवा; फायदे वाचून…
GH News July 09, 2026 02:10 AM

उन्हाळा असो वा हिवाळा किचनचा सर्वात महत्त्वाचा भाग हा फ्रिज असतो. भाज्या, दूध, दही आणि उरलेलं अन्न, फळ, सॉस, पीठ यासह असंख्य गोष्टी फ्रिजमध्ये ठेवले जातात. अगदी मासेही फ्रिजमध्ये ठेवले जातात. कोल्ड्रिंक तर असतेच असते. पण अनेकदा असं होतं की फ्रिज उघडताच एक दुर्गंधी येते. ही दुर्गंधी नाकाला झोंबते आणि त्यामुळे त्रास होतो. पण एक अशी वस्तू आहे की जी फ्रिजमध्ये ठेवली तर ही दुर्गंधी कधीच येत नाही. फ्रिज नेहमी फ्रेश वाटतं.

गेल्या आठवड्यात ठेवलेल्या भाज्या, मच्छी, खराब झालेली कोथिंबीर, कधी कधी झाकण व्यवस्थित न लावलेल्या नॉन व्हेजचीही दुर्गंधी येते. फ्रिज उघडताच दुर्गंधीचा भपका तोंडावर येतो. हळूहळू ही दुर्गंधी इतकी वाढते की दूध आणि दही सुद्धा ही दुर्गंध शोषूण घेते. अशावेळी लोक फ्रिज फ्रेशनर किंववा केमिकल क्लीनर खरेदी करण्याचा विचार करतात. पण खरं सांगायचं तर घरातच अशा असंख्य गोष्टी असतात की त्यामुळे तुम्ही फ्रिजमधील दुर्गंधी घालवू शकता. फक्त त्यासाठी फ्रिजची योग्य स्वच्छता ठेवण्याची आणि एका छोट्या हॅक्सचा वापर करण्याची.

कोळसा भारी…

फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्याचं काम एक छोटासा कोळसाही करू शकतो? ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे. कोळश्याचा तुकडा कागदात गुंडाळून फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवा. कोळश्यामध्ये दुर्गंधी शोषूण घेण्याची जबरदस्त ताकद असते. कोणताही सुगंधी द्रव्य न मिसळता कोळसा दुर्गंधी खेचून घेतो. पण लक्षात ठेवा, कोळसा सुकलेला असावा. ओल्या कोळश्याचा काही परिणाम होत नाही.

एक वाटीभर कोळसा कागदात लपेटून घ्यायचा आणि तो फ्रिजच्या एका कोपऱ्यात ठेवायचा. काही वेळानंतर तुम्हाला फ्रिजची दुर्गंधी दूर झालेली दिसेल. यावरून कोळसा किती परिणामकारक आहे हे दिसून येईल.

स्वच्छता तर हवीच…

फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही देशी उपाय करा किंवा महागड्या गोष्टी बाजारातून आणा. पण एक चूक केली तर त्याने काही फरक पडणार नाही. ती म्हणजे फ्रिजची स्वच्छता. तुम्ही फ्रिजची स्वच्छता नाही केली तर फ्रिजची दुर्गंधी कशानेही जाणार नाही. आठवड्यातून एकदा फ्रिज चेक करा. फ्रिज स्वच्छ करा. फ्रिजमध्ये 6-7 दिवसापूर्वीचं जेवण असेल तर ते काढून टाका. भाज्यांचा ट्रे स्वच्छ करा. कमीत कमी महिन्यातून एकदा फ्रिज खाली करून कोमट पानी आणि हलक्या साबनाने स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ सुकलेल्या कपड्याने साफ करा. स्वच्छ फ्रिजमध्ये दुर्गंधी नाही राहत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.