फ्युजन रेसिपी : शेवग्याच्या पानाची वडी
esakal July 09, 2026 11:45 AM

साहित्य : दोन वाट्या शेवग्याची पाने, एक पाव चणाडाळीचे पीठ; लसूण, हिरवी मिरची पेस्ट, कढीलिंब, हळद.

फोडणीसाठी एक चिरलेला कांदा, धनेजिऱ्याची पूड, मोहरी, चिरलेली कोथिंबीर एक वाटी, पाच ते सहा चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण पेस्ट.

कृती : शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. चणाडाळीचे पीठ, मिरची-लसूण पेस्ट, हळद, मीठ एकत्र करा. भज्याच्या पीठासारखे तयार करून पानात बेसन घालून नीट एकत्र करा. कुकरमध्ये भांड्याला तेल लावून त्यात पसरवा. एक शिट्टी घ्या. थंड झाल्यावर वड्या कापा. वरील साहित्य वापरून फोडणी घाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.