Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज
Saam TV July 10, 2026 12:45 PM
  • महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

  • पुणे व सातारा घाटमाथा परिसरासाठी यलो अलर्ट

  • यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा

  • मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याची IMD ची माहिती

Maharashtra Rain Update Today News गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप दिसून येत असून ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला पावसाचा पट्टा आता पूर्वेकडे सरकत आहे.

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

त्यामुळे आजपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होईल. दुसरीकडे, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरींसह विजांचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.उर्वरित राज्यात मात्र हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

दरम्यान, IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांतही प्रगती केली असून आता मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. यंदा मान्सून देशभर पोहोचण्यासाठी उशीर झाला असला तरी महाराष्ट्रात गेल्या ८ दिवसांत पावसाने चांगली प्रगती केली. सामान्यतः ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण भारत व्यापतो; मात्र यावर्षी तो ९ जुलैनंतर देशाच्या सर्व भागांत पोहोचल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.