Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर
Saam TV July 11, 2026 05:45 PM
  • पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक घटना

  • उभ्या रिक्षात आढळला मृतदेह

  • तरुणाने रिक्षातच घेतला गळफास

  • पोलीस तपास सुरु

पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात एका ऑटो रिक्षाचालकाने स्वतःच्या रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२ वर्षे) असे असून ते चाकण येथील आंबेठाण परिसरातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील सुखवानी हेरिटेज बिल्डिंगसमोर उभी असलेल्या एका ऑटो रिक्षामध्ये प्रमोद साळुंखे यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निगडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.

Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

प्राथमिक तपासात प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाचा वापर करून रिक्षामध्ये गळफास घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी रिक्षामध्ये संशयास्पद स्थितीत व्यक्ती दिसल्यानंतर ही बाब समोर आली. घटनास्थळी तपास पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

दरम्यान, प्रमोद साळुंखे यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास निगडी पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रमोद यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.