ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या ट्रक चालकांना सतत वर्णद्वेषी शिवीगाळ आणि धमक्यांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ऑस्ट्रेलियन ट्रक चालक भारतीयांविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक भाषेत बोलताना ऐकू येत आहे. या क्लिपमुळे ऑस्ट्रेलियातील स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षिततेबाबत नवीन चर्चेला उधाण आले आहे.
ही ऑडिओ क्लिप इंस्टाग्राम क्रिएटर ॲगी (@babysoftarms) यांनी शेअर केली असून, ती ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ABC) च्या तपास अहवालाचा भाग आहे. क्लिपमध्ये एका व्यक्तीने उघडपणे म्हटले आहे, “भारतीयांना मारून टाका. गोऱ्या माणसाच्या बाजूने उभे राहा. यादवी युद्ध (सिव्हिल वॉर) येणार आहे. आम्ही सर्व भारतीय पुरुषांना मारून टाकू, त्यांच्या मुलांना पाण्यात बुडवून मारू आणि स्त्रियांना गुलाम म्हणून विकू.” अशा घृणास्पद विधानांनी अनेकांना संताप आला आहे.
PM Modi Video: पंतप्रधानांच्या मागे उभ्या असलेल्या मुलीने काय इशारा केला? मोदींनीही वळून मागे बघितलं, व्हिडीओ व्हायरलABC च्या अहवालात अनेक भारतीय चालकांनी सांगितले की, रेडिओवरून पंजाबी किंवा भारतीय लहेजात बोलल्यास त्यांना तीव्र शिवीगाळ सहन करावी लागते. एका चालकाने म्हटले, “ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट असेल तर ठीक, पण भारतीय बोलीभाषा ऐकली की शिव्या सुरू होतात.” या सातत्यपूर्ण मानसिक छळामुळे अनेक भारतीय चालकांनी रेडिओचा वापरच बंद केला आहे.
वर्णद्वेष केवळ रेडिओपुरता मर्यादित नाही. दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका पेट्रोल पंपावर पंजाबीत बोलत असलेल्या भारतीय दांपत्याला एका व्यक्तीने “इथे इंग्रजी बोला” असे म्हणून शिवीगाळ केली. नंतर त्याने भारतीय चालकाच्या अंगावर थुंकले. पीडित व्यक्तीने या घटनेला आपल्या आयुष्यातील सर्वात अपमानजनक घटना म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन ट्रकिंग असोसिएशन (ATA) आणि नॅशनल हेवी व्हेईकल रेग्युलेटर (NHVR) यांनी या घटनेचा कडक निषेध केला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा मानसिक छळामुळे चालकांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि रस्ते अपघातांचा धोका वाढतो.
ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलिया संबंध आणखी दृढ झाले. मात्र, भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दोन्ही देशांसमोर गंभीर आव्हान बनला आहे