Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू
esakal July 11, 2026 05:45 PM

मिननाथ पानसरे

जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सुराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झाला. सह्यसखा फाउंडेशनच्या सहकार्याने यापुढील काळात ग्रामीण आदिवासी भागातील या शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षरतेचे धडे गिरवणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गती मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस सह्यसखा फाउंडेशनच्या माध्यमातून अद्ययावत संगणक कक्ष सुरू करण्यात आला असून फाउंडेशनच्या वतीने आठ लॅपटॉप यावेळी भेट देण्यात आले.

Pune: जुन्नरमध्ये सामाजिक उपक्रम; रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाकडून ६० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

यासोबतच अंगणवाडी व ठाकरवाडी तेजुर या शाळांसाठी देखील प्रत्येकी एक लॅपटॉप भेट देण्यात आला. इस्रो व डीआरडीओ चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिलीप देशमुख यांच्या हस्ते यावेळी संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

याप्रसंगी सह्यसखा फाउंडेशनचे पदाधिकारी प्रवीण पवार, संस्थापक अध्यक्ष अमित इंगळे, सिंचन सोल्युशनचे संचालक सागर यादव, डिलेक्शन टेक्नॉलॉजी पुणेच्या संचालिका शितल यादव, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, यशवंत चव्हाण, सरपंच निता घोगरे, स्वाती चतुर, कविता मातेले, अशोक मातेले, बन्सी चतुर, संतोष शेटे, मुख्याध्यापक पंढरीनाथ उतळे, शिक्षक मंगल मरभळ, सुनिल डोळस यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.