MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या
esakal July 11, 2026 11:45 PM

संगमनेर: स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफोडीच्या घटना आणि एमपीएससी परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाविरोधात छात्र भारती संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १०) नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडाव्यात. विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवावा आणि भरती प्रक्रिया नियमितपणे राबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी छात्र भारती संघटनेने हा मोर्चा आयोजित केला होता. मोर्चात संगमनेर शहर व परिसरातील विविध करिअर अकॅडमींमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रांत कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, पोलिस भरती एमपीएससीमार्फत घ्यावी, एमपीएससी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, पेपरफोडीतील दलाल व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या जोरदारपणे मांडल्या.

मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी छात्र भारती संघटनेचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेत मोर्चाची सांगता केली.

आजीच्या सहभागाने वेधले सर्वांचे लक्ष

पोलिस भरती एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी मागणी करणारा फलक हातात घेऊन एका वयोवृद्ध आजी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांसोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविल्याने उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले.

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप.. घोषणांनी परिसर दणाणला

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो, पोलिस भरती एमपीएससीमार्फत घ्या, एमपीएससीचा पेपर ऑनलाइन घेण्याचा निर्णय रद्द करा, पेपर फोडणारे दलाल आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.