शहर आणि गाव यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते जपत मुंबईच्या सायन येथील सह्याद्री सायन प्रतिष्ठानने खेड तालुक्यातील कशेडी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. कशेडी गावाचे मूळ रहिवासी विश्वनाथ खळे यांच्या माध्यमातून गावाशी जुळलेल्या नात्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी गावाला भेट देणाऱ्या मित्र परिवाराने यंदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा संकल्प करत स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई"गावकऱ्यांकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी याची ही छोटीशी परतफेड आहे," अशी भावना मित्र परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून ग्रामस्थांनी या सामाजिक पुढाकाराचे स्वागत करत मित्र परिवाराचे कौतुक केले. या उपक्रमात विश्वनाथ खळे, संगम कोळी, दुर्वेश गावंड, निलेश सोलकर, महेंद्र केणी, अक्षय रेवाळे, सुशांत रेवाळे, प्रशांत बामणे आणि सूरज बंगाल यांनी सहभाग घेतला. शिक्षणासाठी केलेली छोटी मदतही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठी ठरते, याचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा एकदा आला आहे.