गौतम गंभीर बीसीसीआय बातम्या: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने टीम इंडियाचा 4-0 असा सूपडा साफ केला. या दारूण पराभवामुळे भारतीय संघाने टी-20 क्रमवारीतील (ICC Rankings) आपले अव्वल स्थानही गमावले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात एकही सामना जिंकता न आल्यामुळे आता क्रिकेट जगतातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आतातरी बीसीसीआय (BCCI) मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कारवाई करणार का? आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना जाब विचारला जाणार का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
विश्वविजेत्या संघाला अचानक का झालं?
काही महिन्यांपूर्वीच ज्या संघाने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते, तोच संघ आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये इतका कशामुळे कोलमडला? ब्रिटनमधील खेळपट्ट्या आणि वातावरण वेगळे असेल हे ठाऊक असतानाही प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वेळेपूर्वी योग्य तयारी का केली नाही? नव्या उपकर्णधारासोबत किंवा नव्या रचनेसोबत संघात ताळमेळ का निर्माण केला गेला नाही? सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, विश्वविजेत्या संघात अचानक कर्णधार बदलण्याची गरजच काय होती?
ट्रान्झिशन की फक्त कारणे?
प्रशिक्षक गौतम गंभीर अनेकदा पत्रकार परिषदेत पराभवाचे खापर ट्रान्झिशन फेज या शब्दावर फोडतात. परंतु, विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील बहुतांश खेळाडू अजूनही संघात खेळत आहेत, मग गंभीर कोणत्या ट्रान्झिशनबद्दल बोलत आहे? असा सवाल फॅन्स विचारत आहेत. गंभीर यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेले लाजीरवाणे रेकॉर्ड्स टीम इंडियाच्या नावावर जमा झाले आहेत.
गंभीरच्या कारकिर्दीतील भारतीय क्रिकेटची घसरण
3-0 ने पराभव – न्यूझीलंडचा भारत दौरा (कसोटी) – भारताला घरच्या मैदानावर पहिल्यांदाच व्हाईटवॉश
2-0 ने पराभव – दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – घरच्या मैदानावर दारूण पराभव
2-0 ने पराभव – श्रीलंका दौरा (वनडे) – 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली
2-0 ने पराभव – आयर्लंड दौरा (टी-20) – दुबळ्या आयर्लंडकडूनही पराभवाचा धक्का
4-0 ने पराभव – इंग्लंड दौरा (टी-20) पूर्णपणे सूपडा साफ (व्हाईटवॉश)
गंभीरची बोर्डात नेमकी काय सेटिंग?
गौतम गंभीर कधीही स्वतःची चूक मान्य करत नाहीत आणि प्रत्येक पराभवानंतर केवळ कारणे पुढे करतात, असा आरोप सोशल मीडियावर सातत्याने होत आहे. मोठमोठ्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो, पण सलग मालिका हरूनही गंभीरला साधी खरोंचही येत नाही, बोर्डात त्यांची नेमकी काय सेटिंग आहे? अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघाची लंका लागल्यानंतर तरी बीसीसीआय गंभीर यांना जाब विचारणार की, आगामी झिम्बाब्वे दौऱ्याचे गाजर दाखवून नेहमीप्रमाणे ही बाबही दडपली जाणार? याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –