धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
Saam TV July 12, 2026 08:45 PM

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे: जन्मानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुदतपूर्व (Premature) आणि केवळ १.१९६ किलोग्राम वजनाच्या नवजात बाळाच्या तोंडात जन्मत:च असलेले दात (Natal Teeth) आढळून आले. या दुर्मिळ परिस्थितीत बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने NICU मध्ये हे दात यशस्वीपणे काढून बाळाला संभाव्य धोक्यापासून सुरक्षित केले. ही शस्त्रक्रिया शुक्रवारी (१० जुलै) पार पडली.

पुण्यात पाणी संकट आणखी गडद; कोणत्या धरणात किती साठा? ताजी आकडेवारी आली समोर

सामान्यतः नवजात बाळांचे दात काही महिन्यांनंतर येतात. मात्र, काही अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये बाळ जन्माला येतानाच एक किंवा अधिक दात घेऊन जन्मते. वैद्यकीय भाषेत यांना Natal Teeth असे म्हटले जाते. अशा प्रकारचे दातप्रत्येक २,००० ते ३,५०० जिवंत जन्मांमागे केवळ एका बाळामध्ये आढळतात. विशेष म्हणजे सुमारे ८५ टक्के प्रकरणांमध्ये खालच्या जबड्यातील पुढचे मध्यवर्ती दात प्रभावित असतात. या चिमुकल्याच्या बाबतीत दातांमुळे स्तनपानामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच दात अतिशय सैल असल्याने ते श्वासनलिकेत जाण्याचा (Aspiration) धोका निर्माण होऊ शकत होता. याशिवाय जिभेला जखम किंवा व्रण (Riga-Fede Ulcer) होण्याचीही शक्यता होती. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी दात काढण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

ही नाजूक प्रक्रिया मानद बालदंततज्ज्ञ डॉ. श्रेया बापट यांनी दंत विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पल्लवी खळे, डॉ. धैर्यशील एडके आणि डॉ. दिव्या मोकाशी यांच्या समन्वयातून पार पाडली. तसेच बालरोग विभागाच्याप्राध्यापकव विभागप्रमुख डॉ. शैलजा पोतदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले.

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

अत्यंत कमी वजनाचे आणि विशेष निगा आवश्यक असलेल्या नवजात बाळावर NICU मध्ये सुरक्षितपणे उपचार करणे हे मोठे आव्हान असते. मात्र दंत व बालरोग विभागाच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही प्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वीरित्या पूर्ण झालीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.