सटाणा : आर्थिक संपत्तीपेक्षा शारीरिक संपत्ती अधिक मौल्यवान आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण आणि लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयींची जोपासना हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाणा प्राईड यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त ‘एका श्वासाचे अंतर’ या विशेष व्याख्यानात डॉ.हिरेमठ बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल डॉ.राजेश पाटील तर नगराध्यक्ष हर्षदा पाटील, सहाय्यक प्रांतपाल उमेश सोनी, योगेश जाधव प्रमुख पाहुणे होते. डॉ.हिरेमठ यांनी हृदयविकार, जीवनशैलीतील बदल, ताणतणावाचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रोहित शिंदे यांनी तर डॉ. सुमित गुंजाळ यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाणा बागलाणच्या अध्यक्षपदी श्रावणी बच्छाव व सचिवपदी दीपक पाटील, तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ सटाणा प्राईडच्या अध्यक्षपदी म सोनवणे व सचिवपदी दिव्या परदेशी यांनीही पदभार स्वीकारला. सोपान खैरनार व योगेश अहिरे यांनी संपादित केलेल्या 'दिशा' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रांतपाल डॉ.पाटील यांनी रोटरी वर्षातील सेवा, समाजोपयोगी प्रकल्प आणि संघटनात्मक उद्दिष्टांची दिशा स्पष्ट केली. माजी अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी विविध सेवा उपक्रमांचा आढावा सादर केला, तर नूतन अध्यक्ष रोहित शिंदे यांनी आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक भूषण सोनवणे यांच्या माध्यमातून शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे रोटरी क्लबला शीतशवपेटी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल तर उद्योजक दीपक सोनवणे यांनी सामाजिक कार्यासाठी दिलेल्या एक लाख अकरा हजार १०१ रुपयांच्या देणगीबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
सोहळ्यास उपनगराध्यक्ष सुमित वाघ, डॉ.प्रसाद सोनवणे, प्राचार्य अनिल पाटील, डॉ.प्रकाश जगताप, निवृत्त मुख्याध्यापक दयाराम शिंदे, मविप्रचे शिक्षणाधिकारी आबासाहेब शिंदे, चंद्रजीत शिंदे, प्रल्हाद पाटील, निवृत्त मुख्याध्यापक पी.टी.गुंजाळ, बी.डी.बोरसे, प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ.विश्राम निकम, डॉ.मनोज शिंदे, बी.एस.देवरे, दि.शं.सोनवणे, प्रा.राहुल सोनवणे, अतुल कापडणीस, शेखर दळवी, योगेश अहिरे, डॉ.योगेश अहिरे, प्रदीप बच्छाव, प्रशांत भामरे, सचिन भामरे, अनुज भांगडिया, यश भांगडिया, अॅड.निलेश डांगरे डॉ. पवनराज गांगुर्डे, डॉ. प्रशांत गुंजाळ, शांताराम गुंजाळ, डॉ.कुलदीप जाधव, मनोज जाधव, डॉ. अंजली जगताप, प्रियांका खैरनार, सोपान खैरनार, तुषार खैरनार, नितीन मगर, अभिजीत निकम, बी.के. पाटील, रामदास पाटील, अॅड.यशवंत पाटील, मनोज पाटील, अॅड.मनीषा पवार, तुळशीराम पवार, अभिजीत रौंदळ, सुनिता शेवाळे, अभिजीत सोनवणे, कुणाल सोनवणे, निखिल सोनवणे, उमेश सोनवणे, प्रवीण सूर्यवंशी आदींसह सर्व नगरसेवक, रोटरी व रोट्रॅक्टचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्राचार्या रूपाली सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुमित गुंजाळ यांनी आभार मानले.