शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. माझ्या बरोबर अघोरी कृत्य करण्यात आली. मला वेगवेगळ्या बाबा बुवांकडे नेलं. त्यांनी वेगवेगळे उतारे टाकले होते असा आरोप केले होते. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.
विनायक राऊत यांचे तोंड काळं झालं – नितेश राणेया प्रकरणावर बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, ‘असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असतात हे आम्ही ऐकून होतो. आता ते प्रकार त्यांच्या घरातील लोकांनी बाहेर काढलेत. आता ते दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. माणूस असा असूच शकत नाही, अशी कृत्य विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलीत. लाज वाटते ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या जिल्ह्याच नाव त्यांनी खराब केलंय. हे कोणी केलेलं षडयंत्र नाही, तुम्ही केलेलं पाप आहे. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. आता त्यांनी आपलं तोंड उघडू नये. एवढ्या खालच्या थराला राजकारणात कोणी गेलेलं नाही. विनायक राऊत हे ह्यापेक्षा खाली जाऊ शकत नाहीत त्याचं तोंड काळ झालेलं आहे.
अजून खूप काही बाहेर येतील – निलेश राणेपुढे बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, त्यांना नियतीने धडा शिकवलाय. काम करण्यापेक्षा त्यांनी आमच्यावर टीका केली. आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही. कायम त्यांनी राणेंना संपवण्याच टार्गेट त्यांनी केलेलं पण राणे संपले नाहीत. आम्ही असल्या धंद्यात नाही. अजून खूप काही आहे. अनेक लोक त्यांच्यावर उलटणार ज्यांनी तक्रार केली त्यांच्या कडे अजून बराच साठा आहे. आता विनायक राऊत यांनी आपली थोबड बंद करावीत.
विनायक राऊत माझ्यासाठी झिरो…मनी लाँड्रिंगबाबत बोलताना निलेश राणे यांनी म्हटले की, ‘विनायक राऊत काळाबाजारी माणूस आहे. व्हाईट इन्कम आणि विनायक राऊत यांचा संबंध काय? राणेंवर टीका केली तर मातोश्री खुश होणार, ह्या धंद्यात ते 10 वर्ष राहिलेत. मणी लाँड्रिंगचे 17 लाख मोजू नका 17 करोड पण होऊ शकतील. विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहे. माझ्या आयुष्यात किंमत नसलेला माणूस आहे, जे तपासात बाहेर येईल ते थक्क करणारे असेल.