केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक रस्त्ये व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी पुढे सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे असा आरोप केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना, नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलपुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे.
पुढे ते म्हणाले, एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दूसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कैंडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेल आहे आणि या इथेनॉलच काड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्याची वाहने गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे. अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)