Railway Accident : मोठी दुर्घटना टळली! धावत्या विरार-भरूच मेमू ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरलं
Saam TV July 28, 2026 03:45 PM
  • भिलाड रेल्वे स्थानकाजवळ विरार-भरूच मेमू ट्रेनच्या इंजिनची चार चाके रुळावरून घसरली

  • सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली

  • पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत

  • रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे

Mumbai Railway Accident: मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील भिलाड रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी एक मोठी रेल्वे दुर्घटना थोडक्यात टळली. भिलाड रेल्वे स्थानकाजवळ विरारहून भरूचला जाणारी मेमू ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी इंजिनचे ४ चाके रुळावरून घसरले. ही घटना सकाळी सुमारे ६:२७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

रेल्वे प्रशासनाने तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर वलसाड येथून अपघात निवारण रेल्वे तसेच आवश्यक तांत्रिक उपकरणे घटनास्थळी रवाना करण्यात आली. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम करत आहेत.

Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत असून काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Health Care : तुम्ही दररोज किती चमचे तेल खाताय? 'ही' मर्यादा ओलांडल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका

दरम्यान, मुंबईकडे येणारी इंटरसिटी एक्सप्रेस विरार स्थानकात 30 मिनिटांहून अधिक काळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.