दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
वैभव बोडके July 30, 2026 12:13 PM

विटा : विटामध्ये मायाक्कानगर भागात किरकोळ कारणावरून झोपलेल्या ठिकाणी डोक्यात लाकडी दांडके घालून एका परप्रांतीय तरुणांचा परप्रांतीय तरुणाने खून (Sangli Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. राजमन राजाराम कुम्हार (वय २८, रा. धामोरा, चौरी खुर्द, रायठ, सिद्धार्थनगर, बॉसी, उत्तर प्रदेश) असे खून (Sangli Crime News) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक कुम्हार (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मारेकरी फरार झाला आहे.(Sangli Crime News)

विटा येथील मायाक्कानगर येथे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी दयानंद पांडुरंग साबळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी मयत राजमन कुम्हार व संशयित अशोक कुम्हार हे दोघे जण मजूर काम करीत होते. या दोघांत कामावरून नेहमीच वाद होत होती. काल सायंकाळच्या सुमारास नवीन इमारती बेडरूममध्ये राजमन राजाराम झोपलेला असताना चिडून जाऊन अशोक याने राजमन याच्या डोक्यात लाकडे दांडक्याने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला, हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अशोक हा पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिस व पथक रवाना झाले आहे. या प्रकरणी बांधकाम मालक दयानंद साबळे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.(Sangli Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामावर एकत्र काम करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांमधील अंतर्गत वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विटा येथील मायाक्कानगर परिसरात बुधवारी (२९ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. राजमन राजाराम कुम्हार (वय २८, रा. धामोरा, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव असून, झोपेत असताना त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून ही हत्या करण्यात आली.

Sangli Crime News : कामावरून रोजचे वाद अन् रागाच्या भरात कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, मायाक्कानगर येथील बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दयानंद पांडुरंग साबळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर मृत राजमन कुम्हार आणि संशयित आरोपी अशोक कुम्हार (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) हे दोघे मजुरीचे काम करत होते. काम करत असताना या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून नेहमीच बाचाबाची आणि वाद होत असत.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास राजमन इमारतीच्या बेडरूममध्ये झोपलेला होता. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी अशोकने तिथे जाऊन झोपलेल्या राजमनच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने राजमनचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अशोक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी घराचे मालक दयानंद साबळे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अशोक कुम्हारविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विटा पोलीस फरार आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवून पुढील कारवाई करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.