आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 30, 2026 12:13 PM

Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: मनोरंजन विश्वातून (Entertainment News) एक अत्यंत दुःखद आणि काळीज पिळवटणारी बातमी समोर येतेय. आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दिग्गज अभिनेत्री पावला श्यामला (Actress Pavala Shyamala Death) यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण, दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या कलाकारानं आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष मोठ्या पडद्यावरुन रसिक-प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्या दिग्गज कलाकाराला तिच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात मात्र खूप यातना सोसाव्या लागल्या. ज्येष्ठ अभिनेत्री पावला श्यामला (Veteran Actress Pavala Shyamala) यांच्या आयुष्याचे अखेरचे दिवस अत्यंत हलाखीचे आणि वेदनादायी ठरले. आर्थिक अडचणींमुळे काही आठवड्यांपूर्वीच त्या रस्त्यावर अत्यंत असहाय्य अवस्थेत सैरभैर फिरताना आढळल्या होत्या. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतले (Film Industry) बडे स्टार्स त्यांच्या मदतीसाठी सरसावले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले. मात्र, आपलं आयुष्य मनोरंज विश्वासाठी वेचणाऱ्या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला. 

आम्ही ज्या अभिनेत्रीच्या अत्यंत वेदनादायी प्रवासाबाबत सांगतोय, त्या म्हणजे, तेलुगू सिनेसृष्टी (Telugu Film Industry) गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पावला श्यामला (Veteran Actress Pavala Shyamala). यांनी आपलं अख्खं आयुष्य सिनेसृष्टीसाठी वाहून घेतलेलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये (Superhit Movies) त्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या. कित्येक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यातही आलेलं. पण, एवढ्या हरहु्न्नरी अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट मात्र, फारच वेदनादायी आणि कालीज चिरणारा अत्यंत दुःखद होता. 

हृदयविकाराच्या झटक्यानं निधन (Actress Pavala Shyamala Died Age Of 75)

एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, ज्येष्ठ अभिनेत्री पावला श्यामला गेल्या काही काळापासून गंभीर आजारांशी झुंज देत होत्या आणि हैदराबादमधील उस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालंय. मंगळवारी, 28 जुलै रोजी पहाटे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी अधिकृत माहिती उस्मानिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. त्यांचं पार्थिव सध्या रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आलंय... त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.


अखेरचा काळ फारच वेदनादायी 

पावला श्यामला यांच्या आयु्ष्यातली शेवटची काही वर्ष अत्यंत वेदनादायी होती. वाढत्या वयासोबतच त्यांची प्रकृती फारच बिघडलेली आणि आर्थिक समस्याही दिवसागणिक वाढतच गेल्या. अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी लग्न केलं आणि लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी एकट्यानं मुलीचा सांभाळ करत विधवा म्हणून आयुष्य व्यतीत केलं. अभिनयाची आवड त्यांना सिनेसृष्टीत घेऊन आली आणि त्यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. पण, कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. 2021 मध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती समोर आली. त्यावेळी सिनेनिर्माते राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी सोशल मीडियावर 'मिलाप' या माध्यमातून निधी संकलन मोहीम सुरू करून त्यांच्यासाठी मदतीचं आवाहन केलेलं.

पावला श्यामला यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या सोशल मीडिया कँपेनमध्ये सांगण्यात आलेलं की, पावला श्यामला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होत्या. दैनंदिन खर्च भागवणंसुद्धा त्यांना कठीण झालं होतं. त्यात त्यांच्या मुलीलासुद्धा टीबी होऊन ती अंथरुणाला खिळलेली. तिचं सर्व पावला श्यामलाच करायच्या. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झालेली. वैद्यकीय उपचार आणि घरखर्च भागवण्यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीत मिळालेले पुरस्कार आणि ट्रॉफीदेखील विकल्याचं समोर आलेलं.

रस्त्यावर सैरभैर फिरताना आढळलेली अभिनेत्री (Actress Pavala Shyamala Found Destitute On Street)

पावला श्यामला यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळापासून टॉलीवूडमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलंय, पण गेल्या काही वर्षांत त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलेला. वयोमानानुसार उद्भवलेले आजार आणि आजारी मुलीची देखभाल यांच्यासोबतच, त्यांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागला. मे महिन्यात, पैशांअभावी त्यांना रुग्णालयातून परत पाठवण्यात आलेलं आणि त्यानंतर त्या पोलिसांना रस्त्यावर सैरभैर फिरताना आढळल्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांना उपचारासाठी दाखल केलं. त्यावेळी साउथ सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि व्यक्तींनीही त्यांना मदतीचा हात दिला होता.

त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर येताच, सिनेनिर्माते दिल राजू आणि त्यांची टीम मदतीसाठी पुढे सरसावलेली, त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांच्या संपूर्ण उपचारांची व्यवस्था केली. याआधी, राज आणि डी.के. यांनीही सोशल मीडियाद्वारे जनतेला त्यांना मदत करण्याचं आवाहन केलेलं. चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन आणि साई दुर्गा तेज यांच्यासह अनेक कलाकारांनीही त्यांना पाठिंबा दर्शविल.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत, 'गोलीमार', 'खडगम', 'आंध्रवाला' आणि 'वर्षम' यांसारख्या सिनेमांमधील विनोदी भूमिकांमुळे श्यामला यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली. त्यांनी चिरंजीवी, प्रभास, ज्युनियर एनटीआर आणि अल्लू अर्जुन यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलेलं. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला 'मथु वदलारा' हा त्यांचा शेवटचा मोठा सिनेमा होता. त्यांच्या अभिनयातील काही सीन्स तर 'मीम्स' म्हणूनही खूप लोकप्रिय झालेत.

Murugan Panavila Death: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.