Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; 'त्या' पत्रात काय ?
Tv9 Marathi July 30, 2026 12:45 PM

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून राज्यभरातील अनेक रेस्टॉरंट, उपहारगृहे, डेअरींची तपासणी करून तिथे पुरेशी स्वच्छता नसे, नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. पण आता तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामागचं कारण म्हणजे, मुंढे यांच्याविरोधात आता 29 कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना पत्र लिहीलं असून त्यात तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या पत्राने मोठी खळबळ माजली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) प्रयोगशाळेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधलं . कामकाजाची नियमित वेळ असूनही अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत काम करावं लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शनिवारची सुट्टी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे असून, तसे या पत्रातही नमूद करण्यात आलं आहे.

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याच या तक्रारीत लिहीण्यात आलं आहेच. तसेच वाढत्या कामाच्या ओझ्यामुळे, अन्न व औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर, त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनावर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी आपल्या आक्षेपांची लेखी नोंद केली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.