मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे नागपूर रेल्वे नेटवर्क मध्य भारतातील प्रमुख शहरांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. छिंदवाडासह पांडुर्णा, रायपूर, बिलासपूर आणि कोलकाता दरम्यान नागपूर आणि इटवारी स्थानकांमार्गे मोठ्या संख्येने रेल्वे सेवा चालतात.
यामुळे नागपूरच्या प्रादेशिक आणि आंतरराज्यीय रेल्वे कनेक्टिव्हिटीचे महत्त्व अधोरेखित होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. सध्याच्या आकडेवारीनुसार, नागपूर रेल्वे नेटवर्क हे विदर्भाला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बंगालसह देशाच्या विविध भागांशी जोडणारे एक प्रमुख रेल्वे केंद्र आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या नागपूर आणि इटवारी स्थानकांवरून छिंदवाडासाठी आठ रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. दिल्ली मार्गावर पांढुर्णासाठी ३६ रेल्वे सेवा कार्यरत आहे.
ALSO READ: बिहारमधील तृतीयपंथी समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारणार; जाणून घ्या याचे मुख्य कारण
यामुळे रेल्वे नेटवर्कद्वारे विदर्भ आणि मध्य प्रदेश दरम्यान प्रवाशांची वाहतूक सुलभ होत आहे. रायपूर आणि बिलासपूरसाठी मजबूत जोडणी: छत्तीसगडमधील प्रमुख शहरे असलेल्या रायपूर आणि बिलासपूरसाठी नागपूरहून पुरेशा रेल्वे सेवा देखील उपलब्ध आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, नागपूर आणि रायपूर दरम्यान १०४ रेल्वे सेवा, तर नागपूर आणि बिलासपूर दरम्यान ७८ रेल्वे सेवा कार्यरत आहे. ही जोडणी व्यापार, रोजगार, शिक्षण आणि प्रवासासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.
ALSO READ: मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, नाशिक मधील घटना
Edited By- Dhanashri Naik