- बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठक सुरू असताना समोरील भागात उभे असलेल्या एका शासकीय वाहनावर झाड अचानक कोसळले.
- यामध्ये शासकीय वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून कुठलीही हानी नाही.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली अभिजीत दिपके यांची भेट- दिपकेंच्या निवासस्थानी जाऊन आई-वडिलांशी साधला संवाद.
- माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले अभिजीत दिपके यांचे अभिनंदन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या लगावली कान शिलात.बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पादाधिकाऱ्याने सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जमाफीच्या यादी बाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बँक मॅनेजर शिवाजी कड यांनी उडावा उडवी ची उत्तरे दिल्याचा आरोप स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचा पदाधिकारी असलेल्या अमोल पाटील यांनी केला आहे.... या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे..याप्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी कड यांनी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस...अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला आले नदीचे स्वरूप.......
दिघी कोल्हे येथील नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शिरले गावात.......
प्रशासनाने गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये दाखलराज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज बीड दौऱ्यावर दाखल झाल्या असून, त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज त्या विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठका घेणार असून, रात्री उशिरापर्यंत या बैठकांचे सत्र चालणार आहे. उद्या होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक मात्र विशेष महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती.. पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचा नेतृत्वात जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक पार पडणार आहे.होणाऱ्या पहिल्याच बैठकीतही निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा गाजणार का, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संततधार पावसाचा फटका; कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणीगडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता बँकिंग सेवेलाही बसला आहे. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रयतवारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत पावसाचे पाणी शिरल्याने आजचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे.
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील पिपरी मार्गावरील नाल्याला पूरमुसळधार पावसामुळे गिरड- कोरा मार्गावरील दोन नाल्यांना पूर; वाहतूक अनेक तास ठप्प.
शाळकरी विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांना नाल्याच्या दोन्ही बाजूंना थांबावे लागले; काहींना शेजारच्या गावात मुक्काम.
वारंवार होणाऱ्या दुर्घटनांनंतरही उंच पुलाचे काम रखडले; प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी.
बीड जिल्ह्यात सकाळपासून पावसाची दमदार हजेरी पिकांना नवसंजीवनीबीड जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता पिकं सुकू लागली होती. मात्र बीड जिल्ह्यात सर्वच भागात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे बीडच्या 11 ही तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
देवळी तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत.सरूळ येथील यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली; वर्धा- राळेगाव मार्ग बंद.
बोरगाव- आलोडा व अंजी -अंदोरी पूल पाण्याखाली; वाहतूक पूर्णपणे ठप्प.
तहसीलदार आपल्या पथकासह पोचले भिडी गावात, पाणी शिरलेल्या घरांची तहसीलदारांकडून पाहणी
भिडी, शिरपूर व रत्नापूर गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
भिडी येथील यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात गुडघाभर पाणी; विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर.
शेतीला मुसळधार पावसाचा फटका, काही जमीन खरडली
सोलापूर विद्यापीठातील सिनेट सदस्यांचा राज्यपालांसमोर संतापसिनेट सदस्यांना असान व्यवस्था न केल्यामुळे सिनेट सदस्यांचा व्यासपीठासमोरच ठिय्या
कल्याणमध्ये युवक काँग्रेसकडून खासदार कंगना रनौत यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न,रस्त्यावर ठिय्या आंदोलनकल्याण युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज कल्याणमध्ये खासदार कंगना रणौत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि खासदार कंगना रणौत यांच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला.
Nashik: नाशिक महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी केली खड्डेमय रस्त्यांची पाहणीनाशिक -
- नाशिक महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी केली खड्डेमय रस्त्यांची पाहणी
- तातडीने खड्डे दुरुस्ती करण्याच्या सूचना
- खड्ड्यांमुळे अपघात झालेल्या रस्त्याच्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार, पालिका अधिकाऱ्यांना देखील यामध्ये खेचणार
- महापौर हिमगौरी आडके यांचा इशारा
Tulajapur: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनमहाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली.
यावेळी राज्यपालांनी श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरून आरती केली तसेच परंपरेनुसार कुलधर्म व कुलाचार केले.
Delhi: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर
राज्यसभनंतर लोकसभेत विधेयक मंजूर
विधेयक मंजूर होताच लोकसभेचे कामकाज स्थगित
Nashik: खड्ड्यांमुळे 5 नाशिककरांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जागनाशिक -
- खड्ड्यांमुळे पाच नाशिककरांचे बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग
- युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू
- तर महापौर आणि उपमहापौरांनी देखील केली रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी
- शहरातील सर्वच भागातील खड्डे तातडीने बुजवण्यास सुरुवात
राज्यातील सर्व शाळांमध्ये 50 मीटर अंतरावर जंक फूडवर विक्रीवर निर्बंध लावण्याचे आदेश देण्यात आलेअन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे...नागपुरात रामदासपेठ आणि आणि धंतोली या परिसरात आढावा घेतला असतांना शाळांच्या ५० मीटर परिसरातही जंक फूड संबंधित दुकाने मिळून आले आहे
विद्यार्थ्यांच्या परिस्थितीला गृहमंत्री जबाबदार- खर्गेविद्यार्थी गावोगावातून आंदोलनाला आले आहेत. त्यांच्यावर पॅलेट गनचा वापर करून गोळीबार केला गेला. त्यांच्या हातापायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? यासाठी गृहमंत्रीच जबाबदार आहेत. तुम्ही बंद खोलीत बसून माझे बोलणं ऐकत असाल, पण तुम्ही लपून राहू शकणार नाही. एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर ओढून आणू आणि जनतेसमोर तुमचे खरे रूप दाखवू, असंही खर्गे म्हणालेत.
पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे आंदोलनपुणे महापालिकेसमोर मुख्य प्रवेशद्वार समोर आंदोलन
महानगरपालिकेच्या गलथान,ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात शिवसेना पुणे शहरच्या वतीने जनआक्रोश मोर्चा
ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे,
पुण्यात गाड्या तोडफोड सत्र सुरूच, उत्तमनगर परिसरात चार ते पाच गाड्याची तोडफोडअज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पोलिस आरोपीचा तपास करत आहेत
सीसीटीव्ही मध्ये एक व्यक्ती चार चाकी गाड्या फोडताना दिसत आहे.
गाड्याची तोडफोड करतानाच सीसीटीव्ही समोर
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीकाराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "हजारो विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने संसदेकडे मोर्चा काढला होता. त्यांना सरकारशी संवाद साधायचा होता. मात्र, त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला. रेल्वे स्थानके आणि इंटरनेटही बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला."
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी भीतीपोटी धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्यात आलं- खर्गेखर्गे म्हणाले की, राहुल गांधी धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर सरकारला हे प्रकरण अधिक वाढवणे योग्य ठरणार नाही, याची जाणीव झाली. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी भीतीपोटी धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्यात आले. मात्र, विद्यार्थी अनेक महिन्यांपासून आंदोलन करत असताना त्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष का केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांना विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे झुकावे लागले – खर्गेराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि अखेर पंतप्रधानांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं लागलं. विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावं लागलं आणि खुर्ची जाण्याच्या भीतीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या, असा आरोप त्यांनी केला.
पेपर फुटीची मूळ समस्या सोडवण्याचा सरकारचा हेतू नाही- खर्गेखर्गे म्हणाले, या दुरुस्ती विधेयकाचे आम्ही स्वागत करतो, पण सरकारची भूमिका प्रामाणिक वाटत नाही. सध्या निर्माण झालेले वातावरण शांत करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे. पेपरफुटीची मूळ समस्या सोडवण्याचा सरकारचा खरा हेतू यात दिसत नाही.
पेपरफुटीविरोधी विधेयकावर खर्गे यांचा सरकारवर निशाणाराज्यसभेत पेपरफुटीविरोधी विधेयकावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी "पेपर चोरणारे वाचत राहिले..." या शायरीने आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की, 2024 मध्येच आम्ही अधिक कडक कायद्याची मागणी केली होती, मात्र सरकारने ती मान्य केली नाही.
नाशिक - शिंदे सेना आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीपालिका आयुक्तांच्या दालनात शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक आक्रमक
ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे आणि शिंदे सेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यात जोरदार खडाजंगी
अँटी पेपर लीक विधेयकावर विरोधकांकडून 'हे' खासदार मांडणार भूमिकाराज्यसभेत अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसकडून मुकुल वासनिक भूमिका मांडणार आहेत. समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव, आम आदमी पक्षाकडून संजय सिंह, तर तृणमूल काँग्रेसकडून सागरिका घोष किंवा राजीव कुमार चर्चेत सहभागी होणार आहेत.
राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरुहे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलंय. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. आपल्या सादरीकरणात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या पेपर फुटीचा तसंच विरोधी पक्षांची शासन असलेल्या राज्यांमधील पेपर लीक प्रकरणांचा घटनांचा दाखला दिला. विधेयक सादर होत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठा गदारोळ केला.
परभणी जिल्ह्यात रेड अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहनपरभणी जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, पूल, बंधारे आणि सखल भागांपासून दूर राहावे, तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या रस्त्यांवरून वाहने चालवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात संततदार पावसामुळे जिल्ह्यातील पूर्णा माध्यम प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडलेप्रकल्पातुन ३ गेट २० सेमी उघडल्याने पूर्णा नदी पात्रात ४८.०१ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग वाढविण्यात येत आहे.
त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत रेड अलर्टप्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा दाखलदोन दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषद मध्ये एका युवतीने अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता
जिल्हा परिषदेत खळबळजनक प्रकार घडल्यानंतर आता मंगेश जगताप याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास-लासलगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा रोड रॉबरीची घटना घडली. किराणा व्यापारी आनंदा घोडेगावकर यांनी कारमध्ये ठेवलेल्या कापडी पिशवीतील 70 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लंपास केली. घटनेनंतर लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.
नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चाशहरातील मारुती मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मोर्चा
पदयात्रेत हजारोंच्या संख्येन तरुण त्याचबरोबर रत्नागिरीकर सहभागी
दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगताशिर्डीच्या साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी फोडून तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली.. आज शेवटचा तिसरा दिवस असल्याने सकाळी काकड आरतीनंतर साईमुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले.. त्यानंतर गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणारपुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती,कार्यक्रम व्यवस्थापन व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील,असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गारवाशी मध्ये आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्र शासनाने रॅपिडो बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीच्या निर्णयाविरोधात टॅक्सी, रिक्षा आणि ऑनलाईन कॅब चालकांनी वाशी येथे तीव्र आंदोलन केले.
आंदोलन करणाऱ्या चालक मालक व संघटनेचे अध्यक्ष यांना ताब्यात घेतले
ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले- ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले
- महापौरांना जाब विचारण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले
- सत्ताधाऱ्यांविरोधात ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी
- महापौर येत नाही, तोपर्यंत दालनात आंदोलन सुरूच राहील, ठाकरे सेनेचा इशारा
परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासापरभणी जिल्ह्यात रात्रीपासून रिमझिम पावसाने हजरी लावली होती मात्र सकाळपासून परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षात असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे कारण शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती अखेर दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
पुणे जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणारपुणे जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश
लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब माळीण दुर्घटनेला १२ वर्षे जखमा अजूनही ताज्याचपुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला आज बारा वर्षे पूर्ण झाली. ३० जुलै २०१४ रोजी डोंगराची प्रचंड दरड कोसळून संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले आणि १५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारा वर्षांनंतरही त्या काळजाचा ठाव घेणाऱ्या आठवणी आजही ताज्याच आहेत.
Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंदगडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिना नदीला पूर आला असून आष्टी–आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी दक्षिण गडचिरोलीतील तब्बल पाच तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआडरायगड पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऑस्कर नावाच्या श्वान चा काल दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. रायगड पोलिसांच्या अनेक मोहिमेत या श्वानाचे महत्वपूर्ण योगदान होते. ऑस्करने 194 वेगवेगळ्या गुन्हे तपासात यशस्वी कामगिरी करून रायगड पोलिसांना मदत केली होती. मृत्यूनंतर रायगडच्या अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर पोलिस दलाकडून मानवंदना दिल्यानंतर ऑस्करवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाजप नेते विजय चौधरी यांचा उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामाभाजप नेते विजय चौधरी यांचा उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा...
विरोधकांनी बनावट क्लिप व्हायरल करून षड्यंत्र रचल्याचा विजय चौधरींचा थेट आरोप...
माझ्यावरील आरोपांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा.विजय चौधरी यांची मागणी
Bhandara : मध्यरात्रीच्या पावसानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा - लवारी मार्गावरील पुलावर पाणीभंडारा जिल्ह्यात मध्यरात्री सर्वदूर पावसानं जोरदार हजेरी लावली. साकोली तालुक्यातही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. साकोली तालुक्यातील चुलबंद नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं सेंदुरवाफा ते लवारी या दोन गावांना जोडणाऱ्या नदीच्या पुलावर पाणी आहे.
वारणा आणि कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या,नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारासांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे.तर कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहेत.वारणा नदीमध्ये चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पडणारा पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील हळूहळू वाढ होत आहे,कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम आहे. त्यामुळे हरिपूर येथील संगमावर दोन्ही नद्यांचा पात्र विस्तीर्ण बनले आहे,दुथडी भरून दोन्ही नद्या वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघातगाडीमध्ये दोन इसम अडकले होते, गाडीच्या धडकेने झाड खोडासकट तुटून फूटपाथवर पडले.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी व कारचालकांनी एका इसमास बाहेर काढले,पोलिसांच्या नागरिकांच्या व येरवडा अग्निशमन केंद्र व कसबा अग्निशमन केंद्राच्या मदतीने स्टेरिंग व दरवाजामध्ये ड्रायव्हरचा पाय अडकला होता.
मॅन्युअल स्प्रेडर,रोपच्या साह्याने सदर व्यक्तीचा पाय सुखरूप बाहेर काढून जखमी व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात दिले.
नंदुरबार शहरात माकडाचा धुमाकूळ....नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एका माकडाच्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडाने केलेल्या हल्ल्यात एकलव्य विद्यालयातील एक शिक्षक आणि कमला नेहरू विद्यालयातील तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. माकड नागरिकांवर अचानक हल्ले करत असून वस्तू हिसकावून घेत आहे. वन विभागाचे पथक माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रशिक्षित कर्मचाऱ्यांअभावी माकड हुलकावणी देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनात कर्मचाऱ्यांचा आयुक्तांविरोधात एल्गारछत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे थेट निवेदन देत आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर तक्रार केली आहे. या निवेदनात आयुक्तांच्या आदेशानंतर प्रयोगशाळेत दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आल्याचा, प्रत्येक शनिवारी अनिवार्य उपस्थिती लावण्यात आल्याचा, तसेच पूर्वपरवानगीशिवाय रजा नाकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लालपुलिया परिसरात रस्त्यावर उभ्या ट्रकांमुळे वाहतूक विस्कळीतयवतमाळच्या वणीतील लालपुलिया परिसरात भर रस्त्यावर अवजड ट्रक उभे राहत असल्याने वाहतुकीस सातत्याने अडथळा निर्माण होत आहे.यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा करावा,अशी नागरिकांची मागणी आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वादउल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे.
विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यामध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवारी, (दि. २) सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे पुणे- लोणावळा लोकल आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होईल. ब्लॉक काळात यार्डमधील जुने पॉईंट बदलणे आणि ५२ किलो क्षमतेचे लेआउट ६० किलो क्षमतेमध्ये श्रेणी सुधारित करण्याचे काम या काळात केले जाईल.
या ब्लॉकमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १, यूपी मेन लाईन आणि लाईन क्र. १ ते ६ वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहील. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या कमी अंतरावर थांबवल्या किंवा सुरू केल्या जातील. यामुळे प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनाने केले आहे.
भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकापासून जीविताला धोकाधाराशिवच्या भुम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांच्या जीविताला नगरसेवकापासूनच धोका असल्याचं पत्र धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ.कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिल्याने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहून आपत्कालीन नियोजन पूर्ण ठेवण्याचे निर्देश
- संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याच्या सूचना
- पूर नियंत्रण कक्षाला धरणांतील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून वेळेवर नियोजन करण्याचे आदेश
- कमी उंचीच्या पूलांवर पाणी वाढल्यास तातडीने वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे निर्देश
- शहर आणि ग्रामीण भागातील नाले, सांडपाणी वाहिन्यांतील प्लास्टिक तसच अन्य अडथळे तातडीने हटवण्याचे आदेश
मालेगावात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपासवाशिमच्या मालेगाव शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ४ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी समोर आलीये,मिश्रा कुटुंब रात्री घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. घरातील दिवाणामधील लोखंडी पेटीत ठेवलेले ४४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार व कानातील जोड, ३९ ग्रॅम वजनाचा लांब पाठी हार, चार काळ्या मण्यांचे दागिने तसेच ४५ हजार रुपये रोख, असा एकूण ४ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा तालुक्यात आज शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टीगडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
LPG गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरून काळा बाजार करणार रॅकेट पकडलं.बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव शहरा नजीक सुदर्शन हॉटेल शेजारी असलेल्या एका पडक्या घरात महामार्गावरून एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅसची चोरी करताना अन्न व पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून टँकर मधून एलपीजी गॅसची चोरी होताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी राज्यदक्षता पथकाला या अशाप्रकारे गॅस चोरीच परिसरात मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून हा गॅस चोरीचा व काळ्या बाजाराचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता.
१ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना परत जावे लागल्याची तक्रार आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होत असल्याने अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी एसटी प्रशासनाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा ६ टक्के जास्त पाणीसाठासततच्या संतधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ
धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चिंता मिटली
खडकवासला १०० टक्के तर पानशेत ९८ टक्के भरले
गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा ८८ टक्के होता मात्र यंदा तो ९४ टक्क्यांवर
खडकवासला: १०० टक्के
पानशेत: ९८.३८ टक्के
वरसगाव: ९३.४९ टक्के
टेमघर: ८१.६९ टक्के
एकूण पाणीसाठा: ९४.२२ टक्के