World Photography Day: सोलो ट्रॅव्हल करताना स्वतःचे फोटो कसे काढायचे?
Marathi August 19, 2026 09:25 PM

आजकाल सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकट्याने फिरताना चांगला फोटो काढून देण्यासाठी आसपास कोणी नसते किंवा दुसऱ्यांनी काढलेले फोटो मनासारखे येत नाहीत. जर तुम्हीही सोलो ट्रिपचे प्लॅनिंग करत असाल तर वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त जाणून घेऊयात स्वतःचेच जबरदस्त फोटो कसे काढावेत.

बाजारात हलके, फोल्ड होणारे आणि मोबाईलसाठी सोयीस्कर असलेले ट्रायपॉड सहज मिळतात. त्यामुळेट्रायपॉड वापरण्यासाठी फिरायला जाताना सोबत एक छोटा ब्लूटूथ रिमोट ठेवावा, जेणेकरून कॅमेऱ्यापासून दूर उभे राहूनही तुम्हाला हवे तसे फोटो क्लिक करता येतील.
अनेकदा रिमोट पकडणे शक्य नसते. अशा वेळी मोबाईल किंवा कॅमेऱ्यात 5 ते 10 सेकंदांचा टाईमर लावा. तुम्ही फोटो काढताना चालताना किंवा हसतानाच्या  हालचाली करू शकता, ज्यातून कॅनडिड शॉट्स मिळतील.
जर तुम्हाला पोझ देणे कठीण वाटत असेल तर मोबाईल 4K व्हिडिओ मोडवर ट्रायपॉडवर ठेवा आणि कॅमेऱ्यासमोर अगदी नॉर्मल वावरा. नंतर व्हिडिओ पॉझ करून त्यातील आवडत्याफ्रेमचा स्क्रीनशॉट घ्या.
सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळात काढलेले फोटो खूप छान असतात. त्यामुळे या वेळेत फोटो काढताना कॅमेरा जमिनीवर थोडा खाली ठेवून लो अँगल फोटो घ्यावा. यामुळे बॅकग्राउंड आणि लँडस्केप उत्तम कव्हर होतो.
कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये Grid Linesऑन ठेवा. फोटोच्या अगदी मध्यभागी उभे राहण्याऐवजी थोडे बाजूला उभे राहून बॅकग्राउंडला जास्त महत्त्व दिल्यास फोटो अधिक नॅचरल दिसतो.

या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या सोलो ट्रिपच्या आठवणी जमा करू शकता.

हेही वाचा – Men Bag Essentials: पुरुषांच्या बॅगेत असायलाच हव्यात अशा 10 गोष्टी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.