तरुण वयात गुडघे दुखतात? असू शकतात ही कारणे
Marathi August 24, 2026 02:25 PM

पूर्वी गुडघेदुखी किंवा सांधेदुखी हा केवळ वाढत्या वयाचा त्रास मानला जात होता. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता 20 ते 30 वयोगटातील तरुणही गुडघेदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. कमी वयात होणाऱ्या या त्रासामागे रोजच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक दुर्लक्ष ही प्रमुख कारणे ठरत आहेत. आज आपण यामागील साधारण कारणे पाहूयात.

तासनतास एकाच जागी बसणे

आयटी क्षेत्र किंवा डेस्क जॉब करणाऱ्या तरुणांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते. सतत बसून राहिल्याने गुडघ्याचे स्नायू आखडतात आणि सांध्यांवर ताण येतो. ज्यामुळे गुडघेदुखी सुरू होते.

व्यायामाचा अभाव

पुरेसा व्यायाम न करणे किंवा जिममध्ये ट्रेनरशिवाय वजन उचलल्याने लिगामेंट आणि मेनिस्कस दुखावतात. ज्यामुळे तरूण वयातच गुडघेदुखी सुरू होते.

व्हिटॅमिनची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन D, B12 आणि कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होऊन वेदना सुरू होतात.

जास्त वजन

शरीराचे वाढते वजन गुडघ्यांवर दुप्पट भार टाकते, ज्यामुळे सांधे लवकर घासले जातात.

चुकीची फूटवेअर

नियमित हाय हिल्स किंवा खूप सपाट आणि कडक तळाचे बूट, चपला वापरल्याने चालताना पायाचा समतोल बिघडतो. ज्यामुळे गुडघ्यावर ताण येतो आणि दुखण्यास सुरूवात होते.

वेदना सिंड्रोम

जास्त धावणे किंवा पायऱ्या चढ-उतार केल्याने गुडघ्याच्या वाटीभोवती सूज येऊन तीव्र वेदना होतात.

उपाय काय?

  • आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध व सुकामेवा यांचा समावेश करावा.
  • रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसून व्हिटॅमिन D घ्यावे.
  • काम करताना दर तासाला 5 मिनिटांचा ब्रेक घेऊन पाय स्ट्रेच करावे.
  • एकाच जागी बसून काम असेल तर योग्य बूट,चपला वापराव्यात.

महत्त्वाची गोष्ट

वेदना तीव्र असल्यास आणि गुडघ्यावर सूज आल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=zzzhz-ArfkF4

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.