'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
भाग्यश्री कांबळे August 24, 2026 02:43 PM

Aamir Khan Begins Weight Loss for Lalkara: तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत असणारा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान (Aamir Khan) सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे.  त्याचा 'लगान' (Lagaan) हा सिनेमा  तुफान गाजला. 2001 साली रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली.   'लगान' या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आमिर खान पुन्हा एकदा खास स्पोर्ट्स ड्रामा सिनेमासाठी तयारी करत आहे.  (Lalkara)  या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

आमिर खानच्या आगामी चित्रपटाचं नाव काय? (Aamir Khan weight loss for 25 year old role in Lalkara)

'ललकारा'  असे शीर्षक असलेला हा आगामी प्रोजेक्ट, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1952 च्या कसोटी मालिकेवर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमासाठी आमिर खान खास आपल्या लूकवर काम करत आहे.  पडद्यावर 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारण्यासाठी आमिर खान सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने यासाठी काही प्लान्स तयार केले आहेत.  फिल्मफेअरने या प्रोजेक्टशी संबंधित एका सुत्राच्या हवाल्याने म्हटलं की, 'आमिर खान सध्या आशुतोष गोवारीकरच्या (Aamir Khan Begins Weight Loss for) आगामी सिनेमासाठी स्वत:वर काम करत आहे'.

'आमिर खान सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे'. आमिर खान आपल्या भूमिकेसाठी कायम शंभर टक्के देत आला आहे. कोणतीही भूमिका असो,   बॉडी बदलण्याच्या बाबतीत आमिर खान कोणतीही कसर सोडत नाही. भूमिका साकारताना त्या रोलमध्ये फिट दिसण्यासाठी  आमिर खान प्रचंड मेहनत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी खास फरहान अख्तरचीही निवड करण्यात आली होती. परंतु, पण शेड्यूलमुळे त्याला हा प्रोजेक्ट करता येणार नाही.  त्याच्या जागी सिद्धांत गुप्ताला हा रोल ऑफर करण्यात आला आहे. त्यानंतर फरहान अख्तरने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

व्हरायटी  इंडियाशी बोलताना फरहान अख्तर म्हणाला की,  'ज्या प्रोजेक्टशी मी अधिकृतपणे  जोडलेलो नाही, त्या प्रोजेक्टमधून मी कसा काय बाहेर पडेन? आपल्या कारकि‍र्दीत अभिनेत्याला बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी मिळते.    काही प्रोजेक्टसवर तुम्ही साइन करता,   तर काही नाही प्रोजेक्ट्सवर नाही.  बस एवढीच गोष्ट आहे', असं फरहान अख्तर म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड झाली मम्मी; जुळ्या मुलींना दिला जन्म, गुड न्यूज शेअर करत बाळांचं नावही सांगितलं...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.